Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ खाणीमधून सुरू झाली करोनाची ‘कर्मकहाणी’; पहा नेमका कसा झालाय म्युटेशनचा प्रवास..?

दिल्ली : कोरोना विषाणू कसा आला आणि कुठून जगभरात पसरला या प्रश्नाचे उत्तर महामारी सुरू झाल्यानंतर दीड वर्षानंतरही सापडलेले नाही. याबाबत वेगवेगळ्या थिअरी मांडल्या गेल्या आहेत. त्यातील सर्वच थिअरी चीन देश आणि त्यांच्या वूहान या प्रयोगशाळेशी निगडीत सापडलेल्या आहेत. त्यामुळे चीन आता अवघ्या जगाच्या रडारवर आहे. वुहान व्हायरलॉजी लॅब आणि मासळी बाजाराला यासाठी जबाबदार धरले जात आहे. आता पुन्हा एकदा वुहानची ही व्हायरोलॉजी लॅब चर्चेत आहे. कारण, वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेच्या इंटेलिजेंस अहवालाचा हवाला देत दावा केला आहे की, प्रयोगशाळेच्या तीन संशोधकांना नोव्हेंबर 2019 मध्ये कोविड 19 च्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग एका महिन्यानंतर चीनने अधिकृतपणे जगाला नवीन या रोगाबद्दल माहिती दिली.

Advertisement

आता त्यातही आणखी काही माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे चीनमधून या विषाणूचा संसर्ग अवघ्या जगाला झाल्याच्या आरोपांना आणखी जोरदार पुष्टी मिळाली आहे. कारण, एप्रिल 2012 मध्ये तीन कामगारांना चीनच्या युन्नान प्रांतातील तांब्याच्या खाणीवर साफसफाईसाठी पाठविण्यात आले होते. ही खाण बंद आहे. त्यामुळे बॅट्सने (वटवाघुळे) तिथे आपली घरटे बनवली होती. अंधकारमय खाणीमध्ये कोणतीही हवा नव्हती. तिथे या तीन कामगार मंडळींनी स्वच्छता केली. हे केल्यावर दोन आठवड्यांनंतर तिन्ही कामगारांना निमोनियासारखा आजार झाला. यानंतर आणखी तीन वेगळे मजूर तिथे पाठविले गेले. परंतु त्यांनाही तीव्र ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची अडचण येऊ लागली. सर्वांना मग कानमिंग वैद्यकीय शाळेत उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांना व्हेंटिलेटर लावावे लागले. काही महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

त्यावेळी रुग्णांच्या रक्ताचे नमुने वुहान व्हायरलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात आले. ‘बॅट वूमन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. शी झेंगली यांनी त्यांचे विश्लेषण केले. त्यांच्या तपासणीत असे आढळले की, या लोकांचा मृत्यू बुरशीजन्य संसर्गामुळे झाला आहे. आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानंतर ही घटना आणि ही लॅब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. येथून विषाणू पसरल्याच्या आरोपाला बळकटी मिळाली आहे. विशेषत: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गुप्तचर अधिकाऱ्यांना करोना व्हायरसच्या उत्पत्तीविषयी सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि 90 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे.

Advertisement

या आरोपाची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जानेवारीत चीनला एक पथक पाठवले होते. परंतु चीनने सुरवातीपासून ते शेवटपर्यंत पर्यवेक्षण करून देताना मूळ डेटादेखील दिला नाही. पथक परत आल्यावर प्रयोगशाळेच्या करोना विस्फोटाचा सिद्धांत मांडणे फार अवघड बनले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी होत आहे. ब्रिटनचे सरकारचे सल्लागार आणि केंब्रिज विद्यापीठातील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवी गुप्ता यांनीही द टेलीग्राफला सांगितले आहे की प्रयोगशाळा आणि करोना प्रसाराच्या सिद्धांताच्या टोकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अहवालात म्हटले आहे की, युन्नानच्या खाणीतील कामगार आजारी पडल्यानंतर चिनी व्हायरोलॉजिस्टच्या चार पथकांनी तेथून नमुने घेतल्यावर त्यांना वुहान लॅबवर पाठविलेले. तिथे त्यात 9 व्हायरस सापडले. यापैकी एक आरएटीजी 13 होता. जो SARS-CoV-2 प्रमाणेच 96.2% होती. त्यामध्ये आणि कोविड 19 पसरणार्‍या कोरोना विषाणूमध्ये केवळ 15 उत्परिवर्तनांचे अंतर होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply