Take a fresh look at your lifestyle.

WHO ने सांगितला करोनाला मूठमाती देण्याचा फॉर्म्युला; पहा नेमक्या काय सूचना आहेत त्यांच्या

दिल्ली : करोना विषाणू नेमका आला कुठून, जसे या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. तसे या घातक विषाणूचा नायनाट होणार तरी कधी, या प्रश्नाचेही उत्तर मिळालेले नाही. या विषाणूबाबत अनेक दावे केले जातात. विषाणू आला कुठून, करोना महामारी संपणार कधी, या आजाराचा फैलाव कसा झाला, प्राण्यांद्वारे हा आजार पसरतो का, याची माहिती सांगणारे अनेक अहवाल आले. इशारेही दिले गेले. मात्र, तरीसुद्धा या प्रश्नाचे ठोस उत्तर कुणाकडेही नाही.

Advertisement

त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा या महामारीबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. करोना महामारी जगातून लवकर संपणार नाही, असे म्हटले आहे. आरोग्य संघटनेचे युरोपचे निदेशक हांस कुल्गे यांनी सांगितले, की जोपर्यंत जगातील ७० टक्के लोकसंख्येचे करोना प्रतिबंधक लसीकरण होत नाही, तोपर्यंत करोना संपणार नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणच प्रभावी आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने होणेही गरजेचे आहे. मात्र, जगात लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. करोनापेक्षा आता त्याचे व्हेरिएंट जास्त धोकादायक ठरत आहेत, यावर कुल्गे यांनी चिंता व्यक्त केली. तसेच काही उदाहरणे देत याबाबत आधिक माहिती दिली.

Advertisement

जगात अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी आहे. भारतातही लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. आतापर्यंत फक्त २० कोटी लोकांचेच लसीकरण झाले आहे. त्यातच येथे लसींची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे लसीकरणचा वेग आणखीच कमी झाला आहे. लसीकरण वाढवण्यासाठी सरकारचे नियोजन सुरू आहे. मात्र, कागदावरील नियोजन अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. असे असले तरी या वर्षात डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे.

Advertisement

जगात काही देशात अशीच परिस्थिती आहे, तर काही देशांना अजून लसीच मिळालेल्य नाहीत. भारतात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यामुळे देशांतर्गत लसींची मागणी प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असतानाही दुसऱ्या देशांना लस देणे आता तरी शक्य नाही. याचाही परिणाम जागतिक लसीकरणावर झाला आहे. तर दुसरीकडे श्रीमंत देशांनी आपल्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त लसींची ऑर्डरही देऊन ठेवली आहे. काही देशांकडे आजमितीस लसींचा मोठा साठाही आहे. तरी देखील काही देशांना लसी मिळत नाही. अशा परिस्थितीत वेगाने लसीकरण होणार तरी तसे, असा प्रश्न आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply