Take a fresh look at your lifestyle.

‘टाटां’नी हे काय केलं..? ‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’चं धाबं दणाणलं..

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शॉपिंग वाढली आहे. ग्राहक अन्न, तसेच किराणा सामानही आता ऑनलाइनच मागवतात. लोकांची ही गरज ओळखून ‘टाटां’नी भारतातील ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात उडी घेतली आहे. मात्र, त्यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट यांचे धाबे दणाणले आहे.

Advertisement

.. तर ‘टाटा सन्स’ने (Tata Sons) आपली सहाय्यक कंपनी टाटा डिजिटलच्या (Tata Digital) माध्यमातून ‘बिग बास्केट’मधील (Big Basket) 64.3 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. ‘सुपर मार्केट ग्रॉसरी सप्लाय’ करणाऱ्या ‘बिग बास्केट’चा सर्वाधिक हिस्सा याआधी ‘अलिबाबा’कडे होता. बिग बास्केटमध्ये हिस्सेदारी घेण्याबाबत ‘टाटा सन्स’ने ‘सीसीआय’कडे मागणी केली होती.

Advertisement

‘बिग बास्केट’मध्ये ‘टाटां’नी गुंतवणूक केल्याने भारतातील ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ‘बिग बास्केट’मधील हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी ‘टाटा’सह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओ मार्ट आणि ग्रुफर्समध्ये जोरदार स्पर्धा झाली. मात्र, अखेर ‘टाटा’नेच बाजी मारली.

Advertisement

‘बिग बास्केट’ची स्थापना 2011 मध्ये झाली. सध्या देशभरातील महत्त्वाच्या 25 शहरांमध्ये त्यांचा कारभार चालतो. ‘सुपर मार्केट ग्रॉसरी सप्लाय प्रायव्हेट’ (एसजीएस) तर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘बिग बास्केट’मध्ये 64.३ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा खरेदी करण्यास ‘टाटा डिजीटल’ला भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने एप्रिलमध्येच मान्यता दिली होती.

Advertisement

‘सुपर अ‍ॅप’ लाँच करणार
दरम्यान, 2022 मध्ये ‘टाटा डिजिटल’द्वारे ‘सुपर अ‍ॅप’ लाँच केले जाणार आहे. क्विम (फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म), टाटा सीलिक (लाइफस्टाइल ऑनलाइन शॉपिंग साइट) आणि क्रोमा (इलेक्ट्रॉनिक) आदींचा त्यात समावेश असेल, असे सांगण्यात आले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply