Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलशंभरी जोरात; पहा कुठे-कुठे द्यावी लागतेय पैली शंभराची नोट

मुंबई : इंधनाच्या किमतीत वाढ सुरुच असून सरकार सध्या तरी नागरिकांना कोणताच दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाही. एकीकडे करोनाचा त्रास तर आहेच मात्र, दुसरीकडे महागाईचे तडाखे सहन करावे लागत आहेत. खाद्यतेलांच्या किमती भरमसाट वाढल्या. डाळी आवाक्याबाहेर गेल्या.. जवळपास सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, त्यात आता पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीने मोठी भर घातली आहे.

Advertisement

काही केल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. आजही पेट्रोलियम कंपन्यांनी दर वाढवले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २५ ते २६ पैसे आणि डिझेलच्या दरात २८ ते ३० पैसे दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबई शहरातही पेट्रोलने शंभरचा आकडा पार केला आहे. शहरात आता एक लिटर पेट्रोलसाठी १००.१९ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेल ९२.१७ रुपये दराने विकले जात आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९३९४ रुपये आणि डिझेल ८४.८९ रुपये असे नवे दर आहेत. या व्यतिरिक्त देशातील अन्य मोठ्या शहरात पेट्रोलने केव्हाच शंभरचा आकडा पार केला आहे. इंधनाच्या दरवाढीने आता मात्र चांगलेच हैराण झाले असून सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करू लागले आहेत.

Advertisement

इंधनाच्या किमती दररोज सकाळी सहा वाजता बदलत असतात. आजही किमती वाढल्या आहेत. किमती कमी होऊ शकतात. मात्र, सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. इंधनावरील एक्साइज ड्युटी, डिलस लोकांचे कमिशन, तसेच अन्य प्रकारच्या कमिशनमुळे इंधनाच्या किमती दुप्पट होतात. यामुळेच शेजारील देशांच्या तुलनेत आपल्या देशात इंधनाच्या किमती जास्तच आहेत. याद्वारे सरकारलाही भरघोस मिळतो. त्यामुळे लोकांनी कितीही ओरड केली तरी दर कमी करण्याचा विचार सहसा होत नाही. निदान आपल्या देशात तरी असेच आहे.

Advertisement

करोनाच्या काळात सगळ्यांनाच त्रास होत आहे. महागाईचे संकटही आले  आहे. या संकटात सर्वसामान्य नागरिक आधिकच भरडले जात आहेत. त्यामुळे सरकार विरोधात जनतेत रोष वाढत चालला आहे. महागाई कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्याची आज अत्यंत गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, असे काहीच होत नाही. आता तर विमान प्रवास दरात वाढ करुन सरकारने आणखी एक झटका दिला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय करोनामुळे संकटात सापडलेल्या विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला आहे. म्हणजेच, महागाईच्या संकटात होरपळणाऱ्या नागरिकांनाच आता विमान कंपन्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply