Take a fresh look at your lifestyle.

अरे वा..! आता तुम्हालाही मिळणार टोलमाफी, कशी ती तुम्हीच पहा..

मुंबई : वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, त्यामुळे लागणारा वेळ आणि कर्मचाऱ्यांची वर्तणूक, आदी कारणांनी टोलनाके अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असतात. वाहनचालकांचा वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग (Fastag) प्रणाली लागू केली. मात्र, आजही रोखीने टोल भरणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनएचएआय’ने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार तुम्हालाही आता टोलमाफी मिळू शकते.. कशी ते जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचाच..

Advertisement

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोलनाक्यापासून 100 मीटर अंतरावर पिवळी रेषा आखण्यास सांगितले आहे. या पिवळ्या रेषेच्या मागे वाहनांची रांग गेल्यास टोल ऑपरेटरला कोणतेही पैसे न घेता वाहने सोडावी लागतील. म्हणजेच टोलनाक्यावर एखाद्या वाहनास 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागल्यास, कर भरण्यापासून सूट मिळणार आहे. वाहनचालकांना टोलनाक्यावर पुरेशी जागा मिळावी, यासाठी पिक अवर्स (Peak Hours) दरम्यानदेखील हा नियम लागू असेल.

Advertisement

दरम्यान, फास्टॅग प्रणालीव्दारे टोल भरणाऱ्या वाहनासाठी टोलनाक्यावर स्वतंत्र लेन असते. फास्टॅग प्रणाली असणारे वाहनाची टोलची रक्कम आपोआप वजा होते. फास्टॅग प्रणालीमुळे वाहनांचा टोल भरण्याचा वेळ कमी झाला आहे. मात्र, काही कारणांनी या वाहनचालकास 10 सेकंदांपेक्षा जास्त काळ टोलनाक्यावर थांबावे लागल्यास त्यांना टोलमधून सूट मिळणार का, हा प्रश्न तसाच आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply