Take a fresh look at your lifestyle.

कॉंग्रेस करणार मोदी सरकारची पोलखोल; त्यासाठी काढलाय उद्याचा मुहूर्त..!

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्षे पूर्ण होत आहेत. सात वर्षांच्या कार्यकाळात सरकारने निर्णय घेतले. काही निर्णय फायद्याचे ठरले तर काही निर्णयांनी मात्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. करोना काळातील परिस्थिती हाताळण्यात तर केंद्र सरकार पुरते अपयशी ठरल्याचे आता स्पष्टच दिसत आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisement

मोदी सरकारच्या सात वर्षांतील काळ्या कारभाराची पोलखोल करणार असल्याचा इशाराच काँग्रेस पक्षाने दिला असून यासाठी उद्या राज्यभरात निदर्शने करणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कठोर शब्दांत टीका केली. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देश अधोगतीकडे गेला आहे. याची मोठी किंमत देशातील जनता आज चुकवत आहे. विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने देश अगदीच भकास करुन टाकला आहे. देशातील जनतेला मोठी आश्वासन देत सरकार सत्तेत आले. मात्र, यातील एकाही आश्वासनाची पूर्तता गेल्या सात वर्षात केली नाही.

Advertisement

मोदी सरकारने नोटबंदी केली, त्याचा परिणाम देशातील उद्योगांवर झाला. अनेक लहान मध्यम स्वरुपाचे उद्योग बंद पडले. दुसरीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी आणि कामगारांविरोधात कायदे आणले, असे स्पष्ट करत मोदी सरकारच्या सात वर्षांतील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस उद्या राज्यभरात निदर्शने करणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध केला जाणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, करोना काळातही काँग्रेस आक्रमक आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकार पुरते अपयशी ठरले आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी रणनिती तयार केली आहे. देशातील करोनाची परिस्थिती, लसीकरणातील गोंधळ, लसींची कमतरता, रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, यांसारख्या मुद्द्यांवर विरोधक रोजच टीका करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या कारभारावर जनताही नाराज असल्याचे दिसून येत आहे. करोनाच्या संकटातच महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. खाद्यतेलांच्या किमती तर रेकॉर्ड ब्रेक वाढल्या आहेत. या महागाईचाही त्रास होत असल्याने नागरिकांत रोष वाढत आहे. यावरही विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. इंधन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर अद्याप काहीच विचार केलेला नाही. कारण, आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढवले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply