Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून हजारो एलआयसी पॉलिसी लॅप्स होण्याच्या मार्गावर..!

सोलापूर : वेतनातून रक्कम नियमित कपात होऊनही नियमितपणे हप्ते भरले नसल्याने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या एलआयसी (Life Insurance Corporation Of India) पॉलिसी लॅप्स होण्याच्या मार्गावर. त्यामुळे कर्मचाऱ्याचा या दरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना लाभ मिळणे अशक्य याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

मुलांचा विवाह, त्यांचे शिक्षण, घराचे बांधकाम आदी ध्येय समोर ठेवून विमा पॉलिसी (Insurance Policy) घेतल्या जातात. नेक कर्मचाऱ्यांनी काही स्वप्न डोळ्यासमोर ठेवून एकापेक्षा अधिक पॉलिसी घेतल्या असून अशा पद्धतीने पॉलिसी लॅप्स झाल्यास अनेकांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक झटका सहन करावा लागणार आहे. महामंडळासोबतचे करार होणे रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन (Salory) मिळत असतानाच  पॉलिसीच्या हप्त्यांची रक्कम कपात आणि इतर खर्चाची तोंडमिळवणी करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत अत्यंत हलाखीत संसार करण्याची वेळ एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर आलेली आहे.

Advertisement

करोना कालावधीत एखाद्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला अशा कालावधीत एलआयसीकडून कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच काही पाॅलिसीवर कर्जही (Loan) मिळत असते. तसेच मनीबॅक (Money Back) पॉलिसीवर ठराविक रक्कमही परत मिळू शकते. काहींच्या पॉलिसीचा कालावधीही संपत आला आहे. मात्र, या सर्वांचे हप्तेच भरण्यात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांना अपेक्षित लाभ होण्याची शक्यता नाही. महामंडळाने या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची कर्मचारी व्यक्त करत आहेत. मधुकर अनभुले (जिल्ह्याध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना, सोलपुर) यांनी म्हटले आहे की,  कर्मचारी कोरोनाच्या कालावधीत अडचणीत आहेत. अशाही परिस्थितीत त्यांना या नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या या परिस्थितीचा सहानभूतीपुर्वक विचार करावा.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply