Take a fresh look at your lifestyle.

अर्रर्रर्र.. ‘एलआयसी’ने 8 कंपन्यांमधील सगळा हिस्सा विकला, आता तुमच्या पैशाचं काय..?

नवी दिल्ली : एलआयसी.. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी नि सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही.; पण आता सार्वजनिक व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात त्यांचा वाटा फक्त 3.66 टक्क्यांवर आलाय, जो की आतापर्यंतचा सर्वात निम्न स्तर आहे. ‘आयपीओ’ (IPO) येण्यापूर्वी ‘एलआयसी’ने काही मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. मार्च तिमाहीत 8 कंपन्यांमधील आपली संपूर्ण भागीदारी ‘एलआयसी’ने विकलीय.

Advertisement

एका अहवालानुसार, या 8 कंपन्यांमध्ये ‘एलआयसी’चा हिस्सा डिसेंबर तिमाहीत 3.7 टक्के, मार्च 2020 च्या तिमाहीत 3.88 टक्के होता. जून 2012 मध्ये या कंपन्यांमधील ‘एलआयसी’चा वाटा 5 टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर होता.

Advertisement

आता ‘एलआयसी’ने काही कंपन्यांमधील आपले भागभांडवल शून्यावर आणले आहे. त्यात पहिल्या 10 कंपन्यांविषयी ‘एलआयसी’ने माहिती दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘एलआयसी’चा हिस्सा 4.20 टक्के होता, त्याखालोखाल हिंदुस्तान मोटरमध्ये 3.56 टक्के, युनियन बँक ऑफ इंडियात 3.22 टक्के, ज्योती स्ट्रक्चर्समध्ये 1.94 टक्के, मॉर्पेन लॅबमध्ये1.69 टक्के, आरपीएसजीमध्ये 1.66 टक्के, इन्सेक्टइसिडेंसी इंडियामध्ये 1.50 टक्के हिस्सा होता. तसेच दालमिया भारती शुगरमधील 1.50 टक्क्यांची भागीदारी विकून ‘एलआयसी’ने आपले भागभांडवल शून्यावर आणलीय. टक्केवारीच्या आधारे ही सर्वात मोठी घसरण यादी आहे.

Advertisement

‘एलआयसी’ने एचडीएफसी (HDFC) मधील कमाल भागभांडवल कमी करून 2095 कोटी, मारुती सुझुकीत 1181 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 651 कोटी, कोटक महिंद्रा बँकेतील 542 कोटी आणि एशियन पेंट्सची 463 कोटी भागीदारी या तिमाहीत घटवलीय.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply