Take a fresh look at your lifestyle.

तर जगावर येणार आणखी हेही संकट; पहा नेमके काय म्हटलेय संशोधकांनी

दिल्ली : जगासाठी सध्याचा काळ संकटाचाच आहे. करोनासारखा घातक आजार आला. त्यानंतरही अनेक आजार आले. या अनपेक्षित संकटाने लोक हैराण झाले. त्यापाठोपाठ नैसर्गिक संकटांनी आक्रमण केले. कुठे भीषण दुष्काळ पडला तर कुठे चक्रीवादळांनी जोरदार तडाखे दिले. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला, तर कांगो देशात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने लाखो लोक बेघर झाले तर अनेक जणांना प्राणास मुकावे लागले.. अशी संकटेच सध्या सुरू आहेत.

Advertisement

ग्लोबल वॉर्मिंग समस्येचाही हा परिणाम म्हणावा लागेल. या संकटातून बाहेर पडत असतानाच आता आणखी एका नव्या संकटाचा इशारा संशोधकांनी दिला आहे. २०२१ ते २०२५ दरम्यान एक वर्ष अगदी रेकॉर्ड ब्रेक तप्त राहणार आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या वर्षात तापमान १.५ डिग्री वाढ होणार असून हे वर्ष २०१६ पेक्षाही जास्त गरम राहिल. यामुळे आणखीही काही संकटे येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटा येतील, कधी पाऊसही होईल तर कधी पाण्याच्या टंचाईचाही सामना करावा लागेल, हा दावा जगातील दहा देशांच्या वैज्ञानिकांनी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल आर्गनायजेशनच्या अहवालात केला आहे.

Advertisement

तसे पाहिले तर जगातील तापमानात वाढच होत आहे. त्याच बरोबर दुष्काळ, चक्रीवादळेही येत आहेत. मागील दशकात १.५ डिग्री तापमान वाढण्याची होण्याची शक्यता २० टक्के होती. मात्र, या अहवालात हा धोका ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे म्हटले आहे. हवामान वैज्ञानिक लियोन हरमेंसन यांनी सांगितले, की जगाचे तापमान १.५ डिग्री वाढण्याची शक्यता आहे. ही समस्या टाळण्यासाठी तत्काळ ठोस पावले उचलण्याची गरज आहे. कारण, आता आपल्याकडे फार वेळ राहिलेला नाही. या संकटाचा जास्त धोका दक्षिण आशियास राहिल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. कारण, हा प्रदेशास आधीपासूनच जास्त उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा येथे जास्त धोका राहणार आहे.

Advertisement

तापमान वाढीचे हे संकट काही आजचे नाही. याआधीही तापमानात मोठी वाढ झाली आहे. वायू प्रदूषणात वाढ होत आहे. जंगले नाहीशी होत आहे. नद्या व महासागरांचे पाणी मोठ्या प्रमाणात दुषित होत आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यानेही पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे, अशा काही कारणांमुळे आज जग वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे.  या संकटावर मात करण्यासाठी काही उपायही वैज्ञानिकांनी सांगितले आहेत. आता जगातील देशांनी एकत्र येऊन या संकटावर मात करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply