Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईवर मोदी सरकारने सांगितले ‘हे’ महत्वाचे गणित; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली : देशात सध्या करोना प्रतिबंधक लसींची प्रचंड कमतरता जाणवत आहे, त्यामुळे राज्यांना काही ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. केंद्राकडून पुरेशा लसी मिळत नाहीत, अशी तक्रार राज्ये कायमच करत असतात. आणि काही दिवसांपासून या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद होत आहेत. विरोधी पक्षांना सुद्धा मुद्दा मिळाल्याने हे पक्ष सुद्धा केंद्र सरकारवर जोरदार आरोप करत आहेत. केंद्र सरकार मात्र देशात लसींची टंचाई नसल्याचा दावा करत आहे. राज्यांकडे लस शिल्लक असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. तरीसुद्धा हा वाद मिटलेला नाही, त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले, की लस उत्पादनाबाबत कोणत्याही अडचणी नाहीत. देशाची लोकसंख्या जास्त असल्याने सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी विदेशातून लस मागवण्यात येणार आहे. लस हे एक बायोलॉजिकल पदार्थ आहे. त्यामुळे लस तयार करण्यास आणि टेस्टिंग करण्यास वेळ लागतो. तसेच उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा एक निश्चित प्रक्रिया आहे. सध्या पूर्ण जगातच करोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील देश करोना प्रतिबंधक लसींची मागणी करत आहेत. लसींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भारताची लोकसंख्या अन्य देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. देशात सध्या ज्या दोन कंपन्यांना लस निर्मिती करण्यास मंजुरी मिळाली आहे, त्या कंपन्या डिसेंबर २०२० पर्यंत १ कोटी लस दर महिन्यास पुरवठा करण्याची क्षमता होती. आता मात्र देशातील लसींची मागणी पाहता कंपन्यांनी उत्पादन क्षमतेत आधिक वाढ केली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

Advertisement

देशात सध्या लसींची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, राज्यांना मागणीच्या प्रमाणात लसी मिळत नाहीत. त्यामुळे लसीकरण अत्यंत धिम्या गतीने होत आहे. देशात १३० दिवसांत फक्त २० कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर हा आकडा खूपच कमी आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूचा धोका अजूनही कायम आहे. या विषाणूस आळा घालण्यासाठी आता फक्त लसीकरण हाच उपाय आहे. भविष्यात करोनाला रोखायचे असेल तर जास्तीत नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे, असे तज्ज्ञांनी सुद्धा सांगितले आहे. मात्र, अजूनही लसीकरणाचा वेग वाढलेला नाही.

Advertisement

मागील महिन्यांच्या तुलनेत तर में महिन्यात कमी लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे. याच वेगाने लसीकरण होत राहिले, तर सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यास खूप वेळ लागणार आहे, आणि हे देशास परवडणारे नाही. देशातील नागरिकांनी याआधी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतला आहे. आता तर तिसरी लाट येणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात करोनाचा धोका टाळायचा असेल तर वेगाने लसीकरण होण्याची गरज आहे. दरम्यान, देशात आता दुसरी लाट कमी होत आहे. काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे. मागील दोन दिवसांपासून नवीन रुग्णाचा आकडा दोन लाखांच्या आत आला आहे. असे असले तरी मृत्यूदर मात्र कायम आहे. त्यामुळे सरकारचे टेंशन वाढले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply