Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईवर दिल्ली सरकार आक्रमक; पहा काय केला मोदी सरकारच्या नियोजनावर आरोप

दिल्ली : करोना लसीकरणाच्या मुद्द्यावरील राजकारणाने वेग घेतला आहे. केंद्र सरकारच्या लस पुरवठ्यावर संशय व्यक्त करत याचे कॅग ऑडीट करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता आम आदमी पार्टीने पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Advertisement

दिल्लीत करोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. त्यामुळ सरकारने तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन पूर्वतयारी सुरू केली आहे. यासाठी जास्तीत लोकांचे लसीकरण होणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. मात्र, आज दिल्लीत अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. याचे कारण म्हणजे लसींची टंचाई. केंद्र सरकार वेळेत आणि पुरेशा लसी देत नाही. विदेशी लस कंपन्याही राज्यांना लस देणार नसल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, आणि केंद्राच्या लसीकरणाच्या धोरणावर जोरदार टीका होत आहे. उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी आज केंद्राच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, की लस पुरवठ्यात केंद्र सरकारचा आडमुठेपणा अडसर ठरत आहे. राज्यांकडे लसींची कमतरता असताना खासगी दवाखान्यांना लसी कशा मिळत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

Advertisement

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची माहिती देताना त्यांनी सांगितले, की दिल्लीत १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ९२ लाख लोक आहेत. या लोकांच्या लसीकरणासाठी किमान १.८४ कोटी लसींची गरज आहे. केंद्र सरकारने मात्र एप्रिल महिन्यात साडे चार लाख आणि मे महिन्यात ३.६७ लाख डोस दिले. त्यानंतर आता जून महिन्यात साडे पाच लाख डोस देणार असल्याचे कळवले आहे. राजधानी दिल्लीत लसींची कमतरता निर्माण झाली आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली जाते. मात्र, लसीच मिळत नसल्याने आज दिल्लीतील जवळपास सर्वच लसीकरण केंद्रे बंद असल्याची माहिती आहे. शहराची लोकसंख्या जास्त आहे. मात्र, त्याप्रमाणात अजूनही केंद्र सरकारकडून लसी मिळत नसल्याचे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे. देशात अन्य राज्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आता केंद्र सरकारने लसीकरणाचे योग्य नियोजन करुन राज्यांना पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply