Take a fresh look at your lifestyle.

कुरापतखोर चीनला ‘त्या’ देशानेही दिलाय इशारा; पहा चिन्यांनी काय दिलेय प्रत्युत्तरही

दिल्ली : चीनला आपला स्वार्थ साधण्यासाठी समोर कोणताही देश असो त्याचे नुकसान करण्यात काहीच वाटत नाही. शेजारी देशांबरोबर तर चीनचा वाद कायमच असतो. चीनच्या कुरापतींनी अनेक देश हैराण झाले आहेत. मात्र, चीनचे उद्योग काही केल्या कमी होत नाहीत. करोनाच्या संकटातही दुसऱ्या देशांच्या जमिनी बळकावणे, बेटांवर आपला हक्क सांगणे, असे अनेक उद्योग चीन बिनदिक्कतपणे करत आहे. आता फिलीपीन्स आणि चीनदरम्यान असाच वाद ‘थिटु’ नावाच्या बेटावरुन सुरू झाला आहे. संतापलेल्या फिलीपीन्सने चीनला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

Advertisement

या बेटावर सध्या फिलीपीन्सचे नियंत्रण आहे. त्यामुळे चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. फिलीपीन्सच्या लक्षात आल्यानंतर चीनला फटकारले आहे. चीनला स्पष्ट शब्दांत ताकीद देत फिलीपीन्सने म्हटले आहे, की चीनने या बेटाच्या परिसरातील आपले जहाज आणि मासे पकडणारी नाव येथून हटवावी. चीनने मात्र प्रत्युत्तर देत आपल्या संप्रभुतेचा दावा केला आहे आणि या क्षेत्राचे रक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. चीनने असे उत्तर दिल्याने या दोन्ही देशातील विकोपाला जाण्याचीही शक्यता आहे.

Advertisement

बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रात चीन दखल देत आहे. चीनच्या मासे पकडणाऱ्या नावा देखील येथे सातत्याने नियम डावलत असल्याने फिलीपीन्सने राजनयिक विरोधही नोंदवला आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी दक्षिण चीन समुद्र परिसरातील विवादीत परिसरात फिलीपीन्सने सैन्य अभ्यास केला होता. तसेच काही जहाजही तैनात केले होते. फिलीपीन्सच्या या कृतीमुळे चीन संतापला होता. त्यामुळे या वादात आता आधिकच भर पडली आहे. फिलीपीन्सने इशारा दिल्यानंतर थिटु बेटाच्या परिसरातून चीन मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. चीनचा विश्वासघातकी स्वभाव पाहता या देशाकडून दुसरे काही अपेक्षितही नाही.

Advertisement

तसेही करोनाने चीनला जगभरात बदनाम केले आहे. करोना प्रकरणी चीनच्या बेजबाबदारपणाची किंमत आज सगळ्या जगालाच मोजावी लागत आहे. त्यामुळे चीनच्या विरोधात आता लहान देशही उघडपणे बोलत आहेत. करोनाच्या उत्पत्तीबाबत तपासणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जगातील मोठ्या देशांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चीनवर दबाव वाढत चालला आहे. मात्र, तरी सुद्धा चीनच हेकेखोरपणा कमी झालेला नाही. याकडे दुर्लक्ष करत कुरापती काढण्याचे या देशाचे उद्योग आजही सुरुच आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply