Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीने दिलेय काँग्रेसला प्रत्युत्तर; पहा नेमके काय राजकारण पेटले आहे आघाडीच्या घटकपक्षात

अहमदनगर : कोरोना लसीकरणातील गोंधळाबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यावर आरोग्याचा मुद्दा राहिला बाजूला आणि राजकीय वाद विकोपाला गेल्याची गोष्ट अहमदनगर महापालिकेच्या कार्यालयात घडली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सत्तेत भागीदार असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत.

Advertisement

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत आरोप करताना म्हटले की, जुन्या महापालिकेत गेलो असता तेथे आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांसह होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिस वेळेत आले नसते, तर पोलिस अधीक्षक कार्यालयातील हल्ल्यासारखी घटना घडली असती. मागील काही दिवस लस शिल्लक नसल्याचे बोर्ड शहरातील केंद्रांवर लावले जात होते. अंधारात विविध हाॅटेलमध्ये लसीकरण केले जाते. हा गंभीर प्रकार आहे.

Advertisement

त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांचे कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार यांनी म्हटले आहे की, जसे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही. आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या. चार पक्ष फिरून आलेला तो कार्यकर्ता आहे. आमदार जगताप हे सुशिक्षित आहेत. काळे यांना त्यांची जागा यापूर्वीच आम्ही दाखवली आहे. आमदारकीला त्यांचा पराभव झाला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply