Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘ते’ मुख्यमंत्री भडकले मोदी सरकारवर; पहा काय केलेत गंभीर आरोप व टीकाही

दिल्ली : करोना संकटात देशात राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सातत्याने वाद होत आहेत. केंद्र सरकार राज्यांना मदत करण्याऐवजी त्यांना आधिकच त्रास कसा होईल, याचाच विचार करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्य सरकारे केंद्रावर अशाच पद्धतीने टीका करत आहे. आताही झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

सोरेन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की करोना संकटाच्या काळात केंद्र सरकार जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत आहे. राज्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्यवाही करावी, असे केंद्राचे धोरण आहे. पंतप्रधान आपला पोलिटीकल टीआरपी वाढवण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यां बरोबर फोनवर चर्चा करतात. प्रत्यक्षात मात्र, मुख्यमंत्र्यांना राज्यांच्या समस्या सांगण्यासाठी वेळही दिला जात नाही, आणि पंतप्रधान सुद्धा करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी काहीही उपाय सांगत नाहीत. संकटाच्या काळात केंद्राने राज्यांना आवश्यक मदत देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मात्र, केंद्र सरकार जबाबदारी घेत नाही. राज्यांनी त्यांच्या पद्धतीने काय ते करावे, असे त्यांचे धोरण आहे. झारखंड राज्यात भाजपचे सरकार नसल्याने राजकारण होत असल्याचे आता स्पष्टच दिसत आहे, असा आरोप सोरेन यांनी केला.

Advertisement

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. राज्यांनी त्यांच्या पातळीवर लॉकडाउन केले. लसीकरणाच्या बाबतीतही केंद्र सरकार आता असेच करत आहेत. राज्य सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी रोज १२ लाख लसींची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, केंद्र सरकार फक्त दीड लाख लसी देत आहे. लसी अगदीच कमी मिळत असल्याने लसीकरणात अडचणी येत आहेत, असे सोरेन यांनी सांगितले. या अडचणी दूर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसी मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, देशात सध्या असाच वाद केंद्र आणि राज्यांत सुरू आहे. लसी मिळत नाही, त्यामुळे लसीकरण रखडले. ऑक्सिजन मिळत नाही. केंद्र सरकार मदत करत नाही, संकटाच्या काळात राजकारण होत आहे, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या राज्यांना जास्त त्रास होत आहे, अशा तक्रारी आहेत. मात्र, केंद्र सरकार याची दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे या समस्या आजही कायम आहेत. दोन्ही सरकारात समन्वय दिसत नाही. त्यामुळे देशात लसीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. करोना अजूनही नियंत्रणात आलेला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply