Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’.. बेरोजगारी दाखविणाऱ्या पुस्तकाची ‘अमेझॉन’वर विक्री, सगळी 56 पाने कोरी, किंमतही ५६ रुपये..!

मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले. भारतातील बेरोजगारी दाखविण्यासाठी जगातील प्रसिद्ध ‘ई कॉमर्स’ कंपनी ‘अमेझॉन’च्या (Amazon) वेबसाईटवर एक उपहासात्मक पुस्तक विक्रीसाठी ठेवले होते. अवघ्या काही वेळातच या पुस्तकाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Advertisement

झारखंडमधील एका बेरोजगार इंजिनिअर तरुणाने हे पुस्तक ‘अमेझॉन’वर विक्रीसाठी ठेवलं होतं. पुस्तकाचं नाव ‘मास्टरस्ट्रोक’ (Masterstroke- 420 secrets that helped PM in India’s employment growth) असं आहे. त्यावर लेखक म्हणुन ‘बेरोजगार भक्त’ असे लिहिले आहे.

Advertisement

https://platform.twitter.com/widgets.js

Advertisement

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. विशेष म्हणजे, 56 पानांच्या या पुस्तकातील सगळी पानं कोरी असून, पुस्तकाची किंमतही 56 रुपयेच ठेवली आहे. ते ‘किंडल’वर (Kindle) ‘डाऊनलोड’ करता येते.

Advertisement

झारखंडमधील इंजिनिअर तरुणाने सांगितले, की बेरोजगारीमुळे आपल्याला ही कल्पना सुचली. किंडल पब्लिकेशन कसे काम करते, हे तपासण्यासाठी हे केलं. काहीतरी नवं करून लोकांना हसवण्यासाठी मी १५ मिनिटाच्या संकल्पनेत हे पुस्तक तयार करुन ते ‘अमेझॉन’वर 2 दिवस विक्रीसाठी ठेवलं होतं.

Advertisement

आता हे पुस्तक ‘अमेझॉन’वर उपलब्ध नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. सुरुवातीला ‘अमेझॉन’वर लेखकाने नरेंद्र मोदींचा फोटो स्पष्ट दिसेल असा लावला होता, परंतु त्यानंतर कॉपीराईटमुळे तो ‘ब्लर’ करण्यात आला. अवघ्या काही तासातच हे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल झाले नि ते टॉप रेटिंगमध्ये आले होते. काही जणांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply