Take a fresh look at your lifestyle.

गृहमंत्रालयाच्या पोलिसांचा ट्विटरवर दबाव; पहा नेमके काय म्हटलेय ट्विटर इंडियाने

दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याच अखत्यारीत येतात. कोरोना टूलकिटबाबत ट्विटरने प्रथमच स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की...

दिल्ली : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि छुपी हुकुमशाही हे दोन मुद्दे वेळोवेळी चर्चेत आलेले आहेत. आताही ट्विटर इंडियाने याबाबत केलेल्या निवेदनामुळे असाच मुद्दा चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी केलेल्या ट्विटवर ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’ असा टॅग लावल्याने हे प्रकरण उद्भवले आहे. त्यावर पोलिसांच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ट्विटर इंडियाने केला आहे.

Advertisement

दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याच अखत्यारीत येतात. कोरोना टूलकिटबाबत ट्विटरने प्रथमच स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की,  भाजप नेत्यांच्या काही पोस्ट्सना ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’ टॅग दिल्यावर पोलिसांच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या धोक्याचीही काळजी आहे. एकूणच यामुळे केंद्र सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून पोलिसांचा दबाव ठेवण्यात येत असल्याचा मुद्दा पुन्हा ट्रेंडमध्ये आलेला आहे.

Advertisement

भाजप, केंद्र सरकार आणि पोलिसांनी आपल्यावर ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’चा टॅग हटवण्यासाठी कशा प्रकारे दबाव आहे, याचाच पाढा ट्विटर इंडिया यांनी वाचला आहे. ट्विटरने थेट नाव न घेतानाच काही घटना सांगून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी सोशल मीडियाच्या नव्या नियमांचे पालन करणार असल्याचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी सांगून टाकले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply