Take a fresh look at your lifestyle.

गॅस बुकिंगच्या नियमात होणार बदल.. आता असे करावे लागणार गॅस बुकिंग..!

नवी दिल्ली : गॅस बुकिंग (gas booking)केले नसल्यास आणि अचानक घरातील गॅस संपल्यास मोठी तारांबळ उडते. घाई गडबडीत गॅस न मिळाल्यास दोन वेळच्या घासाचा प्रश्न निर्माण होतो. त्यातही गॅस बुकिंगची प्रोसेस किचकट आहे. बुकिंगनंतर गॅस येण्यास आणखी दोन-तीन दिवस जातात. तुम्हालाही या सर्व त्रासाला कधीतरी सामोरे जावेच लागले असेल, पण आता काळजी नसावी.. कारण गॅस बुकिंगची ही किचकट प्रक्रिया बंद करुन सरकार आता LPG सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमात बदल करण्याच्या विचारात आहे.

Advertisement

तुमच्याकडे विशिष्ट कंपनीचा गॅस सिलेंडर (Cylinder) असेल, तर त्याच कंपनीच्या गॅस एजन्सीच्या माध्यमातून तुमचा सिलिंडर रिफिल केला जाऊ शकतो. मात्र, आता सरकार आणि कंपन्या LPG गॅसचं बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया वेगवान करण्याच्या विचारात आहेत. याआधीही सरकारने गॅस बुकिंग प्रक्रियेत काही बदल केले होते. त्यावेळी सरकारने ‘ओटीपी बेस्ड’ (OTP based) गॅस बुकिंग पद्धती सुरू केली होती.

Advertisement

घरगुती गॅसच्या ग्राहकांना सिलेंडर बुक करण्यासाठी त्यांच्याच कंपनीवर निर्भर राहावे लागू नये. कोणत्याही गॅस कंपन्यांकडूनही ग्राहकांना सिलिंडर रिफिल करता यावा, अशी पद्धती आता सरकार आणणार आहे.

Advertisement

दरम्यान, हि योजना अंमलात आणण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एक ‘इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म’ (Integrated Platform) बनवण्याच्या विचारात आहेत. इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या तीन कंपन्या एकत्र येऊन ‘खास प्लॅटफॉर्म’ बनवणार आहेत. सरकारने या तेल कंपन्यांना याबाबत निर्देश जारी केले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply