Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे देशात येतच राहतील करोना लाटा; पहा राहुल गांधीनी काय सल्ला दिलाय मोदींना

दिल्ली : करोना या घातक विषाणूस रोखायचे असेल तर सध्या लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आता हे सिद्ध झाले आहे. इस्त्रायल, अमेरिका या देशांनी जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करुन करोनास बऱ्यापैकी नियंत्रणात आणले आहे. आता तर काही देशात निर्बंधातही सवलत दिली जात आहे. दुसरीकडे भारतात मात्र नेमका लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना लस मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने आज पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणाचा समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राच्या लसीकरण धोरणावर टीका केली.

Advertisement

राहुल गांधी म्हणाले की, करोनास रोखण्यासाठी मास्क, लॉकडाऊन हे तात्पुरते उपाय आहेत. आता यावर लसीकरण हाच कायमस्वरुपी उपाय आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही याबाबत सरकारला सतर्क करत आहोत. मात्र, सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले. आजही देशात फक्त तीन टक्के नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. पंतप्रधानांनी जबाबदारी योग्यपणे पार पाडली नाही. देशात जर याच वेगाने लसीकरण होत राहिले तर तिसरीच काय चौथी, पाचवी लाटही येऊ शकते. करोना मृत्यूंबाबतही सरकार खोटे बोलत आहे. मुळात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची सरकारकडून दिली जात असलेली आकडेवारी खोटी आहे. सरकारला करोनाला समजून घेण्यातही अपयशी ठरले आहे. विरोधक हे काही सरकारचे शत्रू नाहीत. आम्ही तर या संकटात सरकारला मार्ग दाखवत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Advertisement

करोनाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने देशात करोना फोफावल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागले. ऑक्सिजन मिळत नसल्याने हजारो रुग्णांना प्राण गमवावे लागले. केंद्र सरकार मात्र ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा करत राहिले. करोना लसींबाबतही असेच होत आहे. राज्यांकडे लसी आहेत, लसींची कमतरता नाही असा दावा सरकार करत आहे. प्रत्यक्षात मात्र लसी नसल्याने राज्यांत अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे लसीकरण वेगाने होत नाही. लसींची मागणी केली जात आहे मात्र, त्या प्रमाणात लसीच मिळत नसल्याची राज्यांची तक्रार आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. संकटाच्या काळातही केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply