Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींनी मोदींना म्हटलेय, ‘पॉझिटिव्हीटी इज पीआर स्टंट’; हेल्थ पोलिटिक्स जोरात, नागरिक वाऱ्यावर

दिल्ली : करोना विषाणूमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. दुसऱ्या लाटेत तर ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आता करोनाची दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असला तरी मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. दररोज मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘सकारात्मकता हा मृत्यूचे आकडे लपवण्याासाठी पंतप्रधान मोदींनी केलेला पीआर स्टंट आहे. त्यांच्या निर्णयांमुळे झालेले मृत्यू लपवण्यासाठी हा केला आहे.’

Advertisement

देशातील करोनाची परिस्थिती, वाढती महागाई, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती या मुद्द्यांवर राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकावर टीका करत आहेत. देशातील करोनाच्या परिस्थितीवर तर त्यांनी अनेकवेळा केंद्राच्या कारभारावर टीका केली आहे. तसेच करोना आटोक्यात आणण्यासाठी वेळोवेळी उपायही सांगितले. इशारे दिले. मात्र, या कशाचाच परिणाम केंद्र सरकावर झाला नाही. त्यामुळेच दुसऱ्या लाटेच्या भीषण संकटाचा सामना देशास करावा लागला, असा आरोप काँग्रेसचे नेते आजही करतात.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “‘Positivity’ एक PR स्टंट है ताकि PM की नीतियों के कारण हुईं कोरोना मृत्यु के असली आँकड़े छुपाए जा सकें।” / Twitter

Advertisement

करोनामुळे देशात झालेल्या मृत्यूंवरुन राहुल गांधी यांनी याआधीही केंद्रावर आरोप केला होता. द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात भारतातील करोना मृत्यूंबाबत अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालाचा हवाला देत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता. केद्र सरकार करोनामुळे झालेल्या मृत्यूंचे खरे आकडे लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, त्यानंतर भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर वाद वाढण्याची शक्यता पाहून केंद्र सरकारने यावर प्रतिक्रिया दिली. हा अहवाल खोटा आणि निराधार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले.

Advertisement

करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या आकड्यांचा वाद काही राज्यांतही सुरू आहे. करोना मृत्यूंचे सरकारी आकडे आणि प्रत्यक्षातील मृत्यू यात तफावत असल्याचा आरोप विरोधक करत असतात. या आरोपांमुळे राजस्थान सरकारने राज्यातील मृत्यूंचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात सर्वे  करण्यात येणार आहे. करोनामुळे आणि अन्य कारणांनी झालेल्या मृत्यूंची माहिती गोळा करुन अहवाल तयार केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आदेश दिले आहेत. एकूणच केंद्र सरकार असोत की विरोधी पक्षीय नेते करोनाच्या मुद्द्यावर हेल्थ पोलिटिक्स जोरावर आहे. नागरिकांना मात्र, आरोग्य सुविधा देण्याचे कर्तव्य कोणीही पार पाडीत नसल्याचे केविलवाणे चित्र कायम आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply