Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : खासदार छत्रपतींनी सत्ताधाऱ्यांसह भाजपबाबतही मांडले मुद्दे; पहा त्यांनी नेमके काय म्हटलेय ते

मुंबई : भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आरक्षण देण्यासाठी फ़क़्त तोंडपाटीलकी करणाऱ्या नेत्यांना लक्ष्य करतानाच मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका असेही आवाहन महाविकास आघाडी सरकारसह भाजपच्या नेत्यांना केले आहे.

Advertisement

संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय म्हणून ३ पर्याय सुचवले असून यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रपणे प्रयत्न करून ठोस मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने रिव्ह्यु पिटिशन फाईल करताना ती फाईल लोकांना दाखवण्यासाठी नको, तर फुलप्रूफ पिटीशन म्हणून बनवावी. रिव्ह्यु पिटिशन टिकली नाही, तर अपवादात्मक परिस्थितीत करायचा असलेला क्युरेटिव्ह पिटिशनचा दुसरा पर्याय वापरावा. पूर्ण तयारीनिशी पिटिशन करण्याची काळजी घ्यावी. तसेच राज्य सरकारने राज्यपालांच्या मार्फत कलम ३४२ अ याद्वारे आपला प्रस्ताव केंद्र सरकारला द्यावा. गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दूर करण्यासाठी ५ ते ६ महिने जातील. मग तो प्रस्ताव राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे आणि मग केंद्रीय मागास वर्गीय आयोगाकडे जाईल तिथून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे गेल्यावर आरक्षणाचा मार्ग खुला होईल.

Advertisement

पत्रकार परिषदेतील मुद्दे :

Advertisement
  • मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील मुद्दे मांडतात. पण ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करून देता येऊ शकतो का, हे मी नाही सांगणार.
  • सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही. समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका.
  • कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा नसून आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा.

एकूणच आता पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘उद्रेक कुणी करू नका, करोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो’ असे म्हटल्याने अनेकांनी गैरसमज करून घेतला आहे. तसे काहीही नसून परस्थितीकडे लक्ष वेधून ही लढाई लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply