Take a fresh look at your lifestyle.

मॉन्सून न्यूज अपडेट : पहा कोणत्या तारखेला आगमन होणार मुख्य भारतभूमीवर; मुसळधार पावसाला झालीय सुरुवात

मुंबई : करोनापाठोपाठ नैसर्गिक संकटांचा मोठा फटका देशाला बसला आहे. या संकटातच एक चांगली बातमी मिळाली आहे. मान्सून वेळेआधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळ राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशात करोनाचे संकट आहे. त्यानंतर तौक्ते आणि यास या चक्रवादळांचा काही राज्यांना जोरदार तडाखा बसला आहे. या वादळांनी कोट्यावधींचे नुकसान केले आहे. मान्सूनच्या आगमनावरही या वादळांचा परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

देशात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. ३१ मे रोजी मान्सून केरळमगध्ये येणार असल्याचा अंदाज असला तरी त्याचा परिणाम काही दिवस आधीच दिसून येत आहे. केरळमधील अनेक जिल्ह्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडत आहे. एर्नाकुलम, कोट्टायम, इडुक्की, पठाणमथिट्टा, तिरुवनंतपूरम जिल्ह्यात मागील २४ तासात १९ ते ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आताही राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असून पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळांमुळे काही राज्यांत मुसळधार पाऊस पडला आहे. तौक्ते नंतर यास चक्रीवादळामुळे काही राज्यांना इशारा देण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदल आणि काही नैसर्गिक घडामोडींमुळे अशी वादळे येत आहेत.याचा परिणाम मान्सूनवरही झाला आहे. यंदा मान्सून लवकरच दाखल होणार आहे.

Advertisement

तसेही हवामान विभागाने यंदा देशात मान्सूनचा पाऊस समाधानकारक राहिल असे सांगितले होते. स्कायमेट संस्थेनेही देशात चांगला पाऊस होईल, असे म्हटले होते. या अंदाजाप्रमाणे परिस्थिती दिसत आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने अन्य राज्यांतही मान्सून वेळे आधीच पोहोचेल, अशीही शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. मार्च आणि मे महिन्या दरम्यान देशात १५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. जम्मू काश्मीर आणि लद्दाख वगळता देशातील जवळपास सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. हवामानातील बदल आणि चक्रीवादळांचा परिणाम म्हणून ही स्थिती निर्माण झाली होती. राजधानी दिल्लीत तर मे महिन्यात इतका पाऊस पडला की या पावसाने मे महिन्यातील पावसाचे मागील १३ वर्षातील पावसाचे सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम उत्तर भारतातील काही राज्यात दिसून आला. या वादळाच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, दिल्ली आणि नजीकच्या काही राज्यात मुसळधार पाऊस पडला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply