Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी Vs काँग्रेस आमने-सामने; शिवसेना नेत्याशीही राष्ट्रवादीची बाचाबाची, पहा कुठे घडलाय हा प्रकार

अहमदनगर : राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एक झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस या तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये असलेले वाद मिटण्याऐवजी आणखी विखारी होत आहेत. स्थानिक निवडणूक आणि विकासासह इतर मुद्द्यावर हे तिन्ही पक्ष किंवा यांच्यातील दोन्ही पक्ष एकमेकांशी लढताना दिसत आहेत. आताही राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी अहमदनगर शहरात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शड्डू ठीकाला आहे.

Advertisement

नगर शहराच्या स्थापना दिनी जुन्या महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये या तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी थेट भिडले आहेत. यावर बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनपात बाचाबाची झाल्याची चर्चा शहरात सुरू असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

Advertisement

जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती. त्यांनी खुर्च्यांची आदळा आदळ केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली. कोरोना काळात गुंडांचा जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. या घटनेतून नगर शहरात संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय अशी तणावपूर्ण परिस्थिती मनपात निर्माण झाली होती, असा आरोप काळे यांनी केला आहे.

Advertisement

दुपारी तीनच्या सुमारास किरण काळे हे ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत लसीकरणाच्या शहरातील सुरू असणाऱ्या गोंधळाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते.  ठिकाणी आधीपासूनच आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये जगताप आपल्या गुंड कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने याठिकाणी एकत्रित केले होते.  आमदार जगताप यांच्या चिथावणी वरून त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी काळे यांच्या वर हल्लाबोल सुरू केला. चार-पाच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना जगताप यांचे साठ-सत्तर गुंड कार्यकर्ते यांनी धरा रे, मारा रे अशी अरेरावी सुरू केली. जगताप यांनी त्यात तेल ओतायचे काम कले. त्यामुळे त्यांच्या गुंडांचा उत्साह अधिक वाढला. खुर्च्यांची आदळा आदळ सुरू झाली. बाटल्या फोडण्याचा प्रयत्न झाला. बाचाबाची सुरू झाली, असे काळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Advertisement

काळे यांनी म्हटले आहे की, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना एस. एम. एस. करून या ठिकाणी तातडीने पोलिस बळ पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच त्या ठिकाणी पोलिस पोहोचले. पोलिसांनी तत्परता दाखवली मुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला. अन्यथा आमदार जगताप आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी नगर शहराच्या स्थापना दिनी नगर शहराला पुन्हा एकदा एसपी ऑफीस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती टळली. यावेळी घडलेला प्रकार आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. वेळेस ते पुढेच ताब्यात घेण्याची गरज आहे अन्यथा पुरावा नष्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे सदर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याआधारे घडल्या प्रकाराबद्दल चौकशी करावी.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply