Take a fresh look at your lifestyle.

त्यासाठी शिक्षकांनी ग्रामविकास मंत्र्यांना घातले साकडे; पहा कशाबाबत केली आहे मागणी

अहमदनगर : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने श्रीगोंदा येथे भेट घेवून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली धोरणात सुधारणा करुन शुद्धिपत्रक निर्गमित करण्याची मागणी संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी केली.

Advertisement

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या  निवेदनानुसार प्राथमिक शिक्षका़ंच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदलीविषयी ग्रामविकासमंत्री यांना दिलेली शिफारस पत्र यावेळी सादर करण्यात आले. आंतरजिल्हा बदली टप्पा ५ तात्काळ राबवणे व १०% अट  वगळून बदल्यांची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हातंर्गत बदलीसाठी  ३ वर्षाच्या सेवेनंतर विनंती बदलीचा अधिकार मिळावा, रँडम / विस्थापित शिक्षकांना ३० जून दिनांकावर बदलीची संधी देण्यात यावी. मागील शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना संवर्ग ३ चा लाभ मिळावा. प्रतिकूल क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शिक्षिकांना  बदलीचा अधिकार कायम ठेवावा. सध्या ३० किलोमीटरच्या आत असणाऱ्या पती-पत्नीला वन युनीटचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्या त्यात आहेत.

Advertisement

ग्रामविकास मंत्री यांनी निवेदनाचा स्वीकार करुन  बदली साँफ्टवेअर विकसित झाल्यानंतर लगेचच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हातंर्गत बदलीसंबधी शुद्धिपत्रक काढण्यासंबधी प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेवू असे अभिवचन शिष्टमंडळास दिले. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे वेतन हे दर महिन्याच्या एक तारखेला होण्यासाठी  शालार्थ वेतन प्रणाली ऐवजी सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यासंबंधी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ते निर्देश देण्यासंबंधी विनंती करण्यात आली आहे .

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply