Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ठाकरे सरकारचा केलाय दारूने प्रतीकात्मक अभिषेक; पहा मनसैनिकांनी असा हा घेतलाय पवित्रा

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दारूने प्रतीकात्मक अभिषेक करण्यात आलेला आहे. करोना कालावधीत लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लागू असताना किरणा आणि भाजीपाला बंद आहे. मात्र, दारू जोरात विकली जात असल्याचा निषेध म्हणून मनसैनिकांनी असा पवित्रा घेतला आहे.

Advertisement

बाजारपेठ बंद असताना दुसरीकडे शहरातील दारू दुकानातून खुलेआम सुरू असून दारू विक्री होत आहे. सरकारने घरपोच दारू विक्रीस परवानगी दिल्याने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली.

Advertisement

त्यांच्या समवेत उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने लॉक डाऊन जाहीर करून सर्व व्यापार ठप्प करण्यात आले आहेत. बाजारपेठ, दुकाने असे सर्व बंद करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या अशा जुलमी निर्णयामुळे लोकांकडे दारू घ्यायलासुद्धा पैसे राहिले नाहीत. म्हणजे दारू प्यायची म्हटलं तरी लोकांना आता व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे. अशी परिस्थिती सरकारने सर्वसामान्यांवर आणून ठेवली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कपड्याचे दुकान, किराणा, मोबाईल दुकान, ऑटोमोबाईल, भाजी मार्केट या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार आज दोन ते तीन महिने झाले बेरोजगार आहे. त्यांना पगार नाही. त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री करायची अशीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये 10. हजार रिक्षावाले आहेत. त्यातील फक्त 500 रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे. बँक आणि फायनान्स कंपनी यांचे हप्ते भरायलासुद्धा सर्वसामान्य नागरिक व्यापारी कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. याच्या विरोधात मनसेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केला जाईल असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply