Take a fresh look at your lifestyle.

आणि ‘त्या’ बैठकीमध्येही ममतादीदीने मारली कल्टी; दाखवले मोदींना तेवर, पहा कसा घडला घटनाक्रम

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वेगळ्या पातळीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संबंध खूपच वाईट झालेले आहेत. आताही यास या चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मोदींना मग मुख्यमंत्री ममता दीदी यांनी तेवर दाखवले आहेत. त्यामुळे ही घटना सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

मोदी सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आहेत. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पीएम मोदी यांनी पश्चिम मेदिनीपुरातील काळई कुंडा येथे भेट दिली. येथील बैठकीत पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा प्रारंभिक अहवाल सादर केला. सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव त्याच आवारात असताना दोघांनीही 30 मिनिटे उशिरा या आढावा बैठकीस हजेरी लावली. बैठकीत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळाच्या संबंधित कागदपत्रे पीएम कार्यालयातील मंडळींना सोपविली आणि इतर एका बैठकीला जायचे असल्याचे सांगून मोदींच्या बैठकीला कल्टी मारली.

Advertisement

पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर हे दोन्ही राष्ट्रीय नेते प्रथमच आमने-सामने आलेले आहेत. मोदींनी बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचे 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे आहे. त्यामुळे मोदी आता या राज्याला कितीची मदत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, एक हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांचे सरकार पीडित लोकांसाठी ‘दुआरे त्राण’ (घरीच मदत कारणे) हा कार्यक्रम राबवणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात चक्रीवादळ अम्फान यानंतर बांधण्यात आलेले अनेक बंधारे, पूल आणि रस्ते खराब झाल्याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी वित्त विभागाला दिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply