Take a fresh look at your lifestyle.

‘ती’ आहे मोदींची सर्वात मोठी ‘नाकामी’; पहा नेमके काय म्हटलेय सर्वेक्षण अहवालात

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणात भाजप सरकारची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. एकूणच केंद्रातील सत्ताधीश असलेल्या भाजपला यामुळे मोठा झटका बसला आहे. आता पुन्हा एकदा लोकप्रियता वाढवण्यासाठी मोदी सरकार कोणता फंडा आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

एबीपी न्यूज-सी वोटर्सच्या सर्वेक्षणानुसार मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणजे कोरोना विषाणूच्या विरोधात लढताना निर्माण झालेली आरोग्याची समस्या होय. सर्वेक्षण अहवालात 44 टक्के शहरी लोकांनी करोनामध्ये झालेली अनागोंदी हेच मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील 40 टक्के लोकांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. शहरी भागातील 20 टक्के आणि ग्रामीण भागातील 25 टक्के लोकांनी कृषी कायदे आणि शेतकरी समस्या हा मुद्दा मोदी सरकारचे सर्वात मोठे दुसरे अपयश म्हणून सांगितले आहे. तर, 9 टक्के शहरी आणि 9 टक्के ग्रामीण लोक सीएए कायदा, दिल्ली दंगलीला हे सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे म्हटले आहे. चीनच्या सीमा विवादातही मोदी सरकार अपयशी ठरल्याची भावना 7 टक्के शहरी आणि 10 टक्के ग्रामीण भागातील लोकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

सर्वेक्षण केलेल्या बहुतेक लोकांनी कोरोना संकट हेच सध्या देशातील सर्वात मोठी समस्या असल्याचे वर्णन केले आहे. 36 टक्के लोकांनी कोरोनाचे वर्णन सर्वात मोठी समस्या असल्याचे केले. त्याचबरोबर 18 टक्के लोकांनी बेरोजगारी, 10 टक्के महागाई आणि 7 टक्के भ्रष्टाचार ही देशातील सर्वात मोठी समस्या म्हणून मत नोंदवले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply