Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘तिथे’च होत आहे लसीकरणात गडबड; पहा नेमके काय म्हटलेय मंत्री जावडेकर यांनी

दिल्ली : राहुल गांधी यांनी याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर कडाडून टीका केली होती. देशात लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. आतापर्यंतत फक्त तीन टक्केच लसीकरण झाले आहे. याच वेगाने लसीकरण होत राहिले तर देशात तिसरीच काय चौथी, पाचवी लाट सुद्धा येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप केले. त्यानंतर भाजपच्यावतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोर्चा सांभाळला. काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Advertisement

लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि विरोधकात आता चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर घणाघाती टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप केले. त्यानंतर आता भाजपनेही राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारवरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच देशातील लसीकरणाबाबत एक महत्वाचा दावा केला.

Advertisement

जावडेकर म्हणाले, की केंद्र सरकारने आधीच १०८ कोटी लोकसंख्येच्या लसीकरणाच्या नियोजनाची माहिती दिली आहे. भारतात आजमितीस वीस कोटी लोकांचे लसीकरण झाले असून लसीकरणाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, वेगाने आणि सर्वाधिक लस देण्यात देशाचा दुसरा नंबर आहे. ऑगस्ट महिन्यात लसीकरणाचा वेग आणखी वाढेल. राहुल गांधी यांना लसींची इतकीच काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या काँग्रेसशासित राज्यांवर लक्ष केंद्रीत करावे. या राज्यांतच लसीकरणात गडबड होत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला. देशात लसीकरण वेगाने होत आहे, त्यामुळे २०२१ या वर्षातच डिसेंबरच्या आधीच देशातील लसीकरण पूर्ण झालेले असेल, असा दावा जावडेकर यांनी केला.

Advertisement

तसे पाहिले तर देशात सध्या लसीकरणाचा वेग कमी असल्याचे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. राज्यांना लसी मिळत नसल्याचीही त्यांची तक्रार आहे. त्यामुळे राज्यातील काही लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. दिल्लीत तर लसी शिल्लक नाहीत. युवक, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठीही लसी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच केंद्र सरकारने आता तरी जबाबदारी ओळखून लवकरात लवकर लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. लसींबाबत दबाव वाढत असल्याचे पाहून काल केंद्र सरकारने लसीकरणाच्या नियोजनाची माहिती दिली. देशात आगामी काळात मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन होणार आहे. तसेच देशात लवकरच आणखी चार करोना प्रतिबंधक लसी येणार असल्याचे सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply