Take a fresh look at your lifestyle.

भडका उडणार; चीन भडकला, करोनाच्या मुद्द्यावर दिलेय ‘हे’ प्रत्युत्तर

दिल्ली : करोना विषाणूच्या उत्पत्तीचा वाद वाढण्यास आता सुरुवात झाली आहे. करोना विषाणूच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधण्याचे आदेश अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी गुप्तचर संस्थांना दिले होते. अमेरिकेच्या या निर्णयावर आता चीनने आक्रमक पवित्रा घेत जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. या मुद्द्यावर दोन्ही देशात आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

Advertisement

अमेरिका कोणत्याही परिस्थितीत तथ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, आणि आम्हास कोणत्याही चौकशीची परवा नाही, अशा तीव्र शब्दांत चीनच्या विदेश मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. याआधी जो बायडेन यांनी अमेरिकी गुप्तचर संस्थांना करोना विषाणूच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधून काढण्यासाठी दुप्पट वेगाने प्रयत्न करावेत. तसेच ९० दिवसांच्या आत ठिकाण शोधून अहवाल द्यावा, असे आदेश दिले होते. अमेरिका असे काही करत आहे म्हटल्यानंतर चीन शांत राहिल असे होऊ शकत नाही. चीननेही तत्काळ यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजीयान यांनी यावर आधिक स्पष्ट करताना म्हटले की, अमेरिकेत काही लोक विज्ञान आणि तथ्ये स्विकारण्यास आजिबात तयार नाहीत. असे काही करण्यापेक्षा त्यांनी करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक वेळी चीनला टार्गेट करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावर आता कुणीच माघार घेण्याच्या मानसिकतेत नाही. अमेरिकेच्या या निर्णयामुळे मात्र चीनची डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकाच नाही तर याआधी काही शास्त्रज्ञांनी अशीच मागणी केली होती. अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. एंथनी फाऊची यांनीही याबाबत आधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियानेही असेच वक्तव्य केले होते.

Advertisement

याआधी मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधकांनी चीनचा दौरा केला होता. या संशोधकांनी वुहान शहरातील प्रयोगशाळेत जाऊन तपासणी केली होती. मात्र, असे अनेक महत्वाचे मुद्दे होते ज्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज संघटनेच्या अहवालावर कोणताही देश विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्यानंतर अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्रातील अहवालाने तर जगभरात खळबळ उडाली आहे. आरोग्य संघटना सुद्धा या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या विचारात असल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे  चीनच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, करोनाच्या मुद्द्यावर चीन सुरुवातीपासूनच खोटे सांगत आला आहे. करोनाची माहिती जगाला लवकर कळू दिली नाही. चीनच्या या बेजबाबदारपणाचा त्रास आज अवघ्या जगाला सहन करावा लागत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply