Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून वाढलीय इम्रान खान यांची डोकेदुखी; पहा नेमके काय चालू आहे पाकिस्तानात

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान इम्रान खान भीक मागण्यासाठी दुसऱ्या देशांचा दौरा करत आहेत.

दिल्ली : दहशतवादी कारवायांना कायमच खतपाणी घालणारा मुजोर देश पाकिस्तान आज पुरता कर्जबाजारी झाला आहे. देशाचे राज्यकर्ते तर कर्ज मिळवण्यासाठी दुसऱ्या देशांचे दौरे करत आहेत. पहिले कर्ज मिटवण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे, अशी भीषण परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष आणि येथील नागरिक सुद्धा भडकले असून सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

Advertisement

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान इम्रान खान भीक मागण्यासाठी दुसऱ्या देशांचा दौरा करत आहेत. यामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. पाकिस्तानला आंतराष्ट्रीय संस्था आणि जगातील देशांचा गुलाम बनवून टाकल्याचा आरोप भुट्टो यांनी केला. सन २०२१ मध्ये १० अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्यात आले होते. इम्रान खान यांच्या कार्यकाळात विदेशी कर्ज वाढले असून आता हा आकडा ११६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात याचा देशाला काय फायदा होईल हे सांगता येत नसले तरी येणाऱ्या पिढ्या मात्र या कर्जामुळे हैराण होणार आहेत, अशी टीका भुट्टो यांनी केली.

Advertisement

पाकिस्तान सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेस आधार देण्यासाठी कर्ज घेतले जात आहे. आज तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की आधीचे कर्ज चुकते करण्यासाठी नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना त्रास देण्याचेही निर्णय घेतले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयामुळे देशात तीव्र पडसाद उमटले. नागरिक आणि राजकीय नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यातही सरकारला यश आलेले नाही. त्यामुळेच विरोधक सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. कर्ज घेऊनच देश चालविला जात असल्याचे सध्या  तरी दिसत आहे. कारण देशाचे राज्यकर्ते सध्या कर्जासाठीच दुसऱ्या देशांचा दौरा करत असल्याचे तेथील विरोधकच म्हणत आहेत.

Advertisement

देशात अशी एकामागून एक संकटे येत असले तरी या मुजोर देशाने कुरापती कमी केलेल्या नाहीत. देशातील समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी शेजारी देशांना त्रास कसा देता येईल, असा विचार हा देश करत आहे. यासाठी पाकिस्तानला आता चीन मदत करत आहे. तसेही आता अमेरिकेकडून मदत मिळणे बंदच झाले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply