Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या डोकेदुखीमध्ये वाढ; भारतानेही घेतली आक्रमक भूमिका, पहा नेमका काय आहे मुद्दा

जागतिक आरोग्य संघटनेस तपासणीची परवनगी दिली होती. त्यावेळी सुद्धा अनेक अटी टाकण्यात आल्य होत्या. त्यामुळे आता पुन्हा तपासणी करण्यासाठी चीन तयार होणार का, हा मोठा प्रश्नच आहे.

दिल्ली : अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाच्या मुद्द्यावर सध्या जगभरात चर्चा चालू आहे. करोनाच्या उत्पत्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात आता भारतानेही एन्ट्री घेतली आहे. भारताने पहिल्यांदाच या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सहाजिकच्या चीनच्या डोकेदुखीत आणखी वाढ होणार आहे. या वादामुळे जग दोन गटात विभागले गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात बाकीचे देश काय धोरण स्विकारतात, याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही.

Advertisement

अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानंतर हा वाद सुरू झाला आहे. हा अहवाल आल्यानंतर चीनची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी करोना कुठून आला, याच शोध घेण्याचे आदेश गुप्तचर संस्थांना दिले होते. तसेच तीन महिन्यात अहवाल देण्यासही सांगितले होते. अमेरिकेच्या या कृतीने चीनचा तिळपापड झाला. चीननेही लगेचच यावर प्रतिक्रिया दिली. अमेरिका तथ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, आणि आम्हास अशा कोणत्याही चौकशांची परवा नसल्याचे चीनने म्हटले होते. या घडामोडींचा त्रास चीनला होणार आहे. वुहानच्या प्रयोगशाळेची तपासणी करण्यास चीन सहजासहजी तयार होणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. कारण, याआधी ज्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेस तपासणीची परवनगी दिली होती. त्यावेळी सुद्धा अनेक अटी टाकण्यात आल्य होत्या. त्यामुळे आता पुन्हा तपासणी करण्यासाठी चीन तयार होणार का, हा मोठा प्रश्नच आहे.

Advertisement

यानंतर आता भारताने सुद्धा आधिकृतपणे या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. करोना व्हायरस नेमका कुठून आला, यावर आणखी चौकशी होण्याची गरज आहे. विदेश मंत्रालयाने सांगितले, की जागतिक संघटनेचा अहवाल हा या चौकशीचा पहिला टप्पा होता. या प्रकरणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आधिक चौकशी करण्याची गरज आहे. करोना विषाणू नेमका कुठून जगात पसरला याची तपासणी करण्यासाठी आरोग्य संघटनेसह सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. करोना विषाणूच्या उत्पत्ती प्रकरणी चौकशी करण्यासाठी चीनवर दबाव वाढत चालला आहे. जगभरातून जे अहवाल  येत आहेत त्यातही चीनवर संशय व्यक्त केला जात आहे. कारण, करोनाच्या मुद्द्यावर चीन सुरुवातीपासूनच खोटे बोलत आला आहे. चीनचा हा खोटारडेपणा जगाच्या लक्षात आला आहे. त्यामुळे करोना विषाणू वुहानच्याच प्रयोगशाळेतून जगभरात पसरल्याचा जगाचा संशय पक्का होत चालला आहे. त्यातच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने आधिकच आक्रमक धोरण स्विकारले आहे. त्यामुळे जगातील अन्य देशही आता चीन विरोधात प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply