Take a fresh look at your lifestyle.

आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आरोग्य सेवकांना धक्काबुक्की; पहा कुठे घडलाय असा प्रकार

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील निंबळक येथील आरोग्य केंद्रावर लसीकरण करताना ही घटना घडली आहे.

अहमदनगर : आरोग्य केंद्रावर लसीकरण करताना आरोग्य कर्मचार्‍यांना धक्काबुक्की व दमदाटी केल्याची घटना घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील निंबळक येथील आरोग्य केंद्रावर लसीकरण करताना ही घटना घडली आहे.

Advertisement

गुरुवार दि. 27 मे रोजी फिर्यादी रूपाली मोहकर आणि इतर स्टाफ आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरणाचे कामकाज करत असताना ही घटना घडली आहे. आरोपी राजेंद्र कोतकर, गोरक्ष कोतकर, दत्तू कोतकर आणि सुरेश कोतकर यांनी त्यावेळी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण सुरू करून तेथील रजिस्टरचे फोटो काढण्यास सुरुवात केल्याने मग गोंधळ उडाला. आरोपींनी लसीकरण केंद्रावरील रजिस्टर फेकून दिले. तेथील स्टाफ व आशा वर्कर यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

सर्व आरोपी फरार झाले असून एमआयडीसी पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधार्थ रवाना झालेले आहेत. आरोपींमध्ये असलेले राजेंद्र कोतकर हे निंबळक ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. त्यामुळे नगर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात याची खमंग चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply