Take a fresh look at your lifestyle.

तर काँग्रेसमध्येच पडेल उभी फुट; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आक्रमक झालेत दोन्हीही गट

पुणे : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यावर याविरोधात असलेल्या सामाजिक भावनेची तीव्रता कमी करण्यासाठी महाविकास आघाडीने थेट पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेऊन टाकला आहे. या निर्णयात काँग्रेस पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट निर्णय घेतला गेल्याचा आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष आणि  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मागच्या बैठकीत केला होता. आता होत असलेल्या मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी काँग्रेस पक्षाने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देऊन टाकला आहे.

Advertisement

आज मंत्रीमंडळ बैठक होत आहे. तत्पूर्वीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पटोले यांनी यावर आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. आपला विरोध त्यांनी स्पष्ट सांगूनही हा निर्णय रद्द झालेला नाही. त्यामुळे आता कॉंग्रेसमध्येच यावर दोन गट पडलेले आहेत.

Advertisement

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यास काँग्रेस पक्षामधील ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांचा विरोध आहे. त्यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचे सूचित केले आहे. तर, मराठा समाजातील नेते व आमदार याप्रकरणी नरो वा कुंजरोवा भूमिका घेऊन आहेत. मात्र, सध्याच्या कॉंग्रेस पक्षामधील नेते आणि त्यांची सत्तेची गरज लक्षात घेता पटोले यांनी बाहेर पडण्याची घोषणा केल्यास दुसरा गट सत्तेसोबत राहण्याची शक्यता एका युवा नेत्याने व्यक्त केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply