Take a fresh look at your lifestyle.

‘पीएनबी’ घोटाळ्यातील पसार आरोपी मेहुल चोक्सी सापडला, नीरव मोदीचे काय..?

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला (Punjab National Bank) 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेला मुख्य सूत्रधार उद्योजक मेहुल चोक्सी याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले.

Advertisement

‘पीएनबी’मधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर 2018 मध्ये मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांनी भारतातून पलायन केले होते. कॅरेबियन देश अॅंटिग्वा आणि बार्बुडामध्ये चोक्सी लपून बसला होता. मात्र, ‘अॅंटिग्वा न्यूजरूम’ या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार चोक्सी तेथूनही रविवारपासून (ता.23) बेपत्ता झाला होता.

Advertisement

अॅंटिग्वाच्या जॉन्सन पॉइंट पोलिस स्टेशनमध्ये रविवारी मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. तसेच, कुठेही चोक्सी आढळून आल्यास याबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी स्थानिक जनतेला केले होते.

Advertisement

अॅंटिग्वा येथील चोक्सी निवासस्थानातून रविवारी (२३ मे) संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी तो कारमधून बाहेर पडताना दिसला. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरु केला होता. तो क्युबामध्ये पळाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता.

Advertisement

अखेर तीन दिवसांनी डॉमनिकामध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. ‘दि अँटिग्वा न्यूज रुम’ या वृत्त एजन्सीच्या वृत्तानुसार मेहुल चोक्सी सध्या डॉमनिका पोलिसांच्या ‘क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंट’च्या (सीआयडी) कस्टडीमध्ये असल्याचे वृत्त एजन्सीने दिले आहे. लवकरच मेहूल चोक्सीला अॅटिग्वा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. भारत सरकार अॅटिग्वा कोर्टात दाद मागून चोक्सीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Advertisement

नीरव मोदी लंडनमध्ये

Advertisement

दरम्यान, पीएनबी घोटाळ्यातील दुसरा आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये लपून बसला असून, त्याला भारतात परत आणण्यासाठी इंग्लंडच्या कोर्टात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply