Take a fresh look at your lifestyle.

स्मोकिंगमध्ये ‘त्या’ देशांचा आहे पहिला नंबर; पहा कसा वाढतोय याचा ट्रेंड

मुंबई : धुम्रपान करणे आरोग्यास हानीकारक आहे, असे कितीही ओरडून सांगितले, जाहिराती केल्या तरी, ऐकायचेच नाही असे ठरवलेच असेल तर, धुम्रपान कमी होणार तरी कसे.. मोकळा वेळ मिळाला घ्या सिगरेट.. टेन्शन आलंय मग काय, घ्या सिगरेट.. नुसताच चहा काय घ्यायचा, सिगरेट तर पाहिजेच.. असे चित्र आपण कायमच पाहतो. खास करुन युवावर्गात धुम्रपानाचे प्रमाण वाढत चालले आहे, हे डॉक्टर देखील मान्य करतात. या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत असेही नाही. प्रयत्न होतात मात्र, त्यास फारसे यश मिळत नाही.

Advertisement

व्यसनांबाबत समाजात जागरुकता आणण्यासाठी सरकारी आणि खासगी संस्था प्रयत्न करत आहेतच. ठिकठिकाणी पथनाट्ये, जनजागृती रॅली, तज्ज्ञांची व्याख्याने, युवकांना मार्गदर्शन या माध्यमातून जनजागृती केली जाते. मात्र, तरीसुद्धा आजच्या धावपळीच्या जमान्यात व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे, हे खेदाने म्हणावे लागेल. कारण, ‘द लैंसेट जर्नल’ मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या अहवालात भारतात मागील तीस वर्षात युवकांत स्मोकिंगचे (धुम्रपान) प्रमाण वेगाने वाढल्याचे म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे, २०१९ मध्ये भारतात १५ ते २४ वयोगटातील धुम्रपान करणाऱ्यांची संख्या तब्बल दोन कोटी झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल २०१९ मधील माहितीवर आधारीत आहे, त्यामुळे आज २०२१ मध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असेल.

Advertisement

जगातील २०४ देशांमध्ये केलेल्या सर्वेत असे दिसून आले आहे, की २०१९ मध्ये धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत हा आकडा ११० कोटी इतका झाला आहे. चीन, भारत, इंडोनेशिया, अमेरिका, रशिया, बांग्लादेश, जपान, तुर्की, व्हिएतनाम आणि फिलीपीन्स या देशांत सर्वाधिक धुम्रपान केले जाते.

Advertisement

सिगरेट ओढणे आरोग्यास किती धोकादायक आहे, याची माहिती लोकांना नाही असे नाही. बऱ्याच जणांना हे माहितही आहे. पण, त्याचा काही उपयोग होत नाही. व्यसन सोडण्याची इच्छा तर असते मात्र, प्रत्यक्षात शक्य होत नाही. त्यामुळे घातक सवयीचा आरोग्यावर जो व्हायचा तो परिणाम होतोच. आरोग्य ढासळत जाते. २०१९ मध्ये जगभरात १७ लाख लोक इस्केमिक हृदयविकाराने मृत्यूमुखी पडले आहेत, आणि यास त्यांची स्मोकिंगची सवय कारणीभूत ठरली आहे. आणखी धक्कादायक म्हणजे, स्मोकिंगमुळे ट्रॅकियल, ब्रॉन्कस आणि अन्य प्रकारच्या कॅन्सरने १३ लाख लोकांचे प्राण गेले आहेत. २०१९ मध्ये तंबाखू आणि धुम्रपानामुळे जगभरात ७७ लाख मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply