Take a fresh look at your lifestyle.

लक्ष द्या रे इकडेही.. नोकऱ्यांची संख्या घटलीय; पहा कसा वाढतोय बेरोजगारीचा टक्काही..!

पुणे : रोजगार मिळवण्यासाठी देशातील युवकांचा आटापिटा सुरू असतो. हे एक सार्वत्रिक सत्य आहे. सरकारी नोकरीसाठी तर अपार कष्ट घेण्याची तयारीही असते. मात्र, त्या नोकऱ्या कमी होत आहेत. तर, खासगी क्षेत्रातही रोजगार मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. करोनाच्या संकटाने मात्र सारेच काही गणित उलटून टाकले आहे. सरकारी नोकरी तर सोडाच खासगी कंपन्यांमध्येही रोजगार मिळणे अगदीच दुरापास्त झाले आहे. नोकऱ्या कमी होत असल्याने बेरोजगारीचा टक्काही वेगाने वाढत आहे.

Advertisement

करोनाच्या काळात अनेक कंपन्यांनी काहीच विचार न करता कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी पगार कपात केली आहे. आता करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काही कंपन्या पुन्हा नोकरभरती करत आहेत, काही कंपन्या तसा विचार करत आहे. सरकारी क्षेत्रातही काही ठिकाणी नोकरभरतीसाठी जाहिराती येत आहेत. मात्र, याचे प्रमाण फारच कमी आहे. वास्तविक पाहता, करोनाचा धोका अजून कायम आहे आणि तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी भरतीचा विचार केला जात नाही. सरकारी नोकऱ्यांबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन विभागाने आकडेवारी दिली आहे. त्यानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने २०२० या वर्षात १ लाख १९ हजार तर २०२१ मध्ये ८७ हजार ४२३ जणांची कायम भरती केली आहे. राज्य सरकारांनी २०२१ या वर्षात ३ लाख ८९ हजार ५२ जणांची भरती केली आहे.

Advertisement

मागील वर्षाच्या तुलनेत राज्य सरकारांनीही कमीच भरती केल्याचे म्हटले आहे. करोना संकटाचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकार क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रास करोनाचा जबरदस्त मार बसला आहे. देशात खासगी क्षेत्रात रोजगाराच्या जास्त संधी आहेत. देश जसजसा विकसित होत आहे त्याप्रमाणात रोजगाराच्या संधीही वाढत आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून खासगी क्षेत्रातील रोजगार कमी झाले आहेत. याचे कारण करोनाच आहे. करोनाचा फटका बसल्याने कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कोणताही विचार न करता कर्मचारी कपात केली आहे.

Advertisement

कंपन्यांच्या धोरणात बदल झालेला नाही. आजही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. काही कंपन्या नोकर भरती करत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे देशातील बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गरीबी सुद्धा वाढली आहे. देशात रोजगाराची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारने अजून याचा गांभीर्याने विचार केल्याचे दिसत नाही. या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply