Take a fresh look at your lifestyle.

बोंबला आता.. आणि ‘त्या’ पद्धतीने कॉकटेलसाठी सुरू आहे लस पळवापळवी..!

पुणे : सध्या अनेक लस नोंदणी होत नसलेल्या खासगी रुग्णालये आणि बड्या नेत्यांच्या हॉटेलमध्येच लस देऊन आपली राजकीयदृष्ट्या नाळ मजबूत करण्यात नेते व्यस्त आहेत. त्यामध्ये त्यांनी ही लस नेमकी कशी आणली, याचाच मोठा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, काही ठिकाणी तीच लस कॉकटेलसाठी पळवली जात असल्याचेही स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

आधीच लसीचा तुटवडा असताना कर्नाटक व तामिळनाडूतील अनेक आरोग्य कर्मचारी करोना लस कॉकटेल करून आपली ‘इम्युनिटी बुस्ट’ करीत असल्याच्या बातम्या आलेल्या आहे. त्याच धर्तीवर पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी खासगी पद्धतीने लस दिली जात असल्याची चर्चा आहे. वेगवेगळे फाेन नंबर आणि ओळखपत्रांद्वारे नावनोंदणी करत किंवा सावधगिरीने लस टोचल्यास प्रत्येक कुपीतून एक डाेस वाचवून त्याचीची विक्री करण्याचे हे रॅकेट जोमात आहे. याविरोधात प्रशासकीय पातळीवर काहीही कारवाई होत नसल्याने याद्वारे काही वैद्यकीय अस्थापना, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचे फावले आहे.

Advertisement

करोना लसच्या एका कुपीत १० डाेस देता येतात. त्याचाच लेखाजोखा अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो. मात्र, सावधगिरीने लस टोचल्यास प्रत्येक कुपीतून एक डाेस अतिरिक्त मिळणे शक्य आहे. त्याचाच फायदा घेऊन असा नवा धंदा देशभरात फोफावला आहे. अनेक आरोग्य कर्मचारी काेविशील्डचे २ डाेस घेतल्यानंतर आता काेव्हॅक्सिनचीही लस घेत असल्याच्याही बातम्या आहेत. एकूणच देशात वेगळाच लस पळवापळवीचा उद्योग वेगाने विस्तारत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply