Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारने केला मोठा दावा; म्हटलेय ‘न्युयॉर्क टाईम्सचा तोही अहवाल खोटाच..!’

दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. आता जरी दुसरी लाट कमी होत असल्याचे दिसत असले तरी अजूनही दररोज लाखो रुग्ण सापडत आहेत. वाढत्या मृत्यूदराने सरकारचेही टेन्शन वाढले आहे, अशी परिस्थिती असताना दुसरीकडे भारतातील करोनाबाबत विदेशी माध्यमात अहवाल प्रसिद्ध होत आहेत. याआधी अनेक वेळा असे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. यावेळी मात्र करोना मृत्यूबाबत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालावरुन भारतात वादळ उठले आहे.

Advertisement

या अहवालाचा हवाला देत विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर केंद्र सरकारनेही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला हा अहवाल पूर्णतः निराधार आणि खोटा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार केंद्र सरकारने असे म्हटले आहे, की हा अहवाल कोणत्याही प्रमाणावर आधारीत नाही. विकृत अनुमानांच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत करोनाने ३ लाख १५ हजार २३५ जणांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे, की भारतात आतापर्यंत करोनामुळे मृत्यूंची संख्या किमान सहा लाख तर जास्तीत जास्त ४२ लाख असू शकतो.

Advertisement

हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या अहवालाचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. त्यांनी म्हटले की, करोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. यानंतर भाजपने सुद्धा राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. करोनाच्या प्रत्येक देशाबाबत असे काही ना काही अहवाल येतच आहेत. इशारे दिले जात आहेत. कोणत्या देशात परिस्थिती गंभीर होईल, हे सुद्धा सांगितले जात आहे. भारताबाबत तर सातत्याने असे अहवाल येत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरही विदेशी माध्यमांत टीका करण्यात आली. आताही संयुक्त राष्ट्र संघाने भारतातील करोनाची दुसरी लाटेमुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हा अनुभव पाहता तिसरी लाट रोखण्यासाठी सरकारला आधिक ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply