Take a fresh look at your lifestyle.

सावधान, शेतीचा ट्रेंड आरोग्यातही; ‘त्या’ पद्धतीने लस घेत असताल तर होऊ शकतात दुष्परिणामही..!

मुंबई : करोना कालावधीत शास्त्रोक्त बाबींसह अशास्त्रीय गोष्टींनाही तितकेच उधान आलेले आहे. अमेरिका व युरोपात सध्या लस कॉकटेलवर संशोधन सुरू आहे. अनेकांना वैद्यकीय तज्ञांच्या निगराणीखाली दोन वेगवेगळ्या कंपनीच्या लस दिल्या जात आहेत. भारतीयांनी तीच बातमी वाचून कोणत्याही चाचण्या झालेल्या नसताना लस कॉकटेल सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

लसीचा तुटवडा असताना कर्नाटक व तामिळनाडूतील अनेक आरोग्य कर्मचारी विनाकारण तिसरा डोस घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. वेगवेगळे फाेन नंबर आणि ओळखपत्रांद्वारे नावनोंदणी करून आपली इम्युनिटी बुस्ट करण्याच्या प्रयत्नात असे केले जात असल्याच्या बातम्या आहेत. जसे शेतीमध्ये जास्त रासायनिक कीटकनाशक किंवा खत वापरण्याची पद्धत भारतात आहे. तसेच आता जास्त लस घेण्याचा नवा ट्रेंड येत आहे. कर्नाटक राज्याच्या कोविड सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एम.के. सुदर्शन यांनी याबाबत म्हटले आहे की, आरोग्य विभागाचे काही कर्मचारी भीती आणि मजबूत सुरक्षेसाठी तिसरा अतिरिक्त डोस टोचून घेत असल्याचे समजते. भारतात याबाबत कोणतेही दिशानिर्देश नसल्याने असे करणे टाळावे.

Advertisement

तर, लसीकरणानंतरच्या साइड इफेट्सची अध्ययन करणारी समितीचे चेअरमन डॉ. प्रो. नरेंद्र अरोडा यांनी म्हटले आहे की, दोन डोस पूर्ण झाल्यानंतर इतर कोणत्याही लसीची गरज नाही. दुसऱ्याच कंपनीचा दुसरा डोस टोचणे ही अक्षम्य बेपर्वाई आहे. असे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. लस कॉकटेलवर संशोधन झालेले नाही. त्यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी भारत सरकारने तत्काळ दिशानिर्देश जारी करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply