Take a fresh look at your lifestyle.

रिटेलच्या रिंगणात टाटांचीही एंट्री; पहा अंबानींच्या रिलायंसची कशी वाढणार डोकेदुखी

मुंबई : किरकोळ विक्री क्षेत्रातील (Retailing Marketing) अग्रणी आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आता टाटा ग्रुपशीही (Tata Group) स्पर्धा करावी लागणार आहे. कारण, ऑनलाईन किराणा सेवा बिगबॅस्केट (BigBasket) आणि ऑनलाइन फार्मसी 1mg मध्ये स्टेक खरेदी केल्यानंतर आता टाटा समूह फिटनेस स्टार्टअप (Start Up) क्युरफिटमध्येही (Curefit) गुंतवणूक करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टाटा समूह या स्टार्टअपच्या संपादनाची शक्यता तपासून पाहत आहे.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार टाटा ग्रुप क्युरफिटचे संस्थापक मुकेश बन्सल (Mukesh Bansal) यांच्याशी चर्चा करीत आहे. असे झाल्यास त्यांना टाटाच्या डिजिटल व्यवसायात महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते. बन्सल हे ऑनलाइन फॅशन रिटेलर मिंत्रा (Myntra) याचेही सहसंस्थापक आहेत. मागील 5 वर्षांपासून ते क्युरफिट सांभाळत आहेत. फ्लिपकार्टचे वरिष्ठ कार्यकारी अंकित नागोरी यांच्यासमवेत त्यांनी या उपक्रमाची सुरूवात केली. अद्याप अंतिम चर्चा झाली नसल्याने यातून नेमके पुढे काय येणार याकडे बिजनेसमन मंडळींचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

क्युरफिटने यांनी अलीकडेच Cult.Fit (कल्टफिट) म्हणून नाव बदलले आहे. या स्टार्टअपने आतापर्यंत 41 अब्ज डॉलर्स जमवले आहेत. त्यात गुंतवणूकदारांमध्ये emasek, Accel आणि Kalaari Capital इत्यादींचा समावेश आहे. टाटा समूहासाठी आता देशातील नामांकित उद्योजक एकत्र करण्याची गरज आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), अमेझॉन (Amazon) आणि वॉलमार्ट (Wallmart) यांची कंपनी फ्लिपकार्टविरुद्धच्या लढाईत तो खूप महत्वाचा निर्णय सिद्ध होऊ शकतो.

Advertisement

टाटा सन्सच्या (Tata Suns) प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीला यावर भाष्य करण्याची सध्या इच्छा नाही. तर क्युरफिटच्या बन्सल यांनी अद्याप ईमेलवर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. टाटा सन्सची संपूर्ण मालकीची कंपनी असलेल्या टाटा डिजिटलला (Tata Digital) गेल्या महिन्यात बिगबास्केटमधील 64 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी स्पर्धा आयोगाने मान्यता दिली होती. यामुळे वेगाने वाढणार्‍या ऑनलाइन किराणा (Online Grocery) विभागामधील दिग्गजांच्या स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटाची सुपर अॅप सुरू करण्याची योजनाही चालू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply