Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. वाढले की टेंशन; काळ्या बुरशीच्या रुग्णांचा आकडा पोहोचला ‘इतक्या’ हजारांवर..!

दिल्ली : देशात करोना पाठोपाठ काळ्या बुरशीच्या (ब्लॅक फंगस) आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ११ हजार ७१७ रुग्ण आढळले आहेत. २५ मे २०२१ पर्यंतची ही आकडेवारी आहे.

Advertisement

देशात या आजाराचे रुग्ण वाढत आहे. या आजाराची तीव्रता पाहता १९ राज्यांनी यास महामारी घोषित केले आहे. त्यामुळे रुग्णांची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराचा जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांनीही या आजाराची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. ब्लॅक फंगस प्रमाणेच व्हाईट फंगस आणि येलो फंगसचेही रुग्ण आढळले आहेत. येलो फंगस हा या दोन्ही आजारांपेक्षा जास्त घातक असल्याचे सांगितले जात आहे. येलो फंगस या आजाराचा पहिला रुग्ण दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथे आढळला होता. करोना पाठोपाठ या नव्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या ब्लॅक फंगसचे रुग्ण जास्त आढळत आहेत. त्यामुळे या आजारावरील औषधांची कमतरता होऊ नये, यासाठी नियोजन केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Advertisement

देशात अद्याप करोना नियंत्रणात आलेला नाही. दुसऱ्या लाटेचा जोर आता कमी होत आहे. काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच या आजारातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. तरी देखील धोका टळलेला नाही. आता तर तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. देशात तिसरी लाट येईल की नाही, याबाबत आताच काही सांगता येत नाही. मात्र तरी सुद्धा भविष्यातील धोका लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिल्ली सरकारने नियोजनही सुरू केले आहे. देशातील ऑक्सिजनची स्थिती पाहता चीनमधून सहा हजार ऑक्सिजन सिलिंडर मागवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ४४०० सिलिंडर मिळाले आहेत. बाकीचे सिलिंडरही लवकरच मिळणार आहेत. करोनाची तिसरी लाट आलीच तर त्यावेळी हे सिलिंडर वापरण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त अन्य आवश्यक कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. देशात करोनाची अशी स्थिती असताना ब्लॅक फंगसचा आजार बळावत आहे. आजाराची तीव्रता पाहता राज्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारलाही याबाबत माहिती देण्यात येत आहे. दोन्ही सरकारांकडून नियोजन करण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply