Take a fresh look at your lifestyle.

अनलॉकबाबत आदित्य ठाकरेंनी म्हटलेय ‘असे’; १ जूननंतर काय होऊ शकते महाराष्ट्रात

राज्यात १ जूनपर्यंत निर्बंध आहेत. मात्र, राज्यात आता रुग्णसंख्या कमी

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध आहेत. आता मात्र दुसऱ्या लाटेचा ओसरत असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळ निर्बंधात सवलत देण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारही असाच विचार करत आहे. मात्र, टप्प्याटप्यात निर्बंध कमी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे. निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करावे लागतील. लगेचच सर्वकाही उघडणार नाही. राज्यातील करोना परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

राज्यात १ जूनपर्यंत निर्बंध आहेत. मात्र, राज्यात आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. या निर्बंधांमुळे व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता निर्बंधात सवलती द्याव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सरकारवरही दडपण आले आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. या बैठकीत लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. देशातच आता दुसरी लाट कमी होत आहे. अनेक राज्यात रुग्ण कमी होत आहेत. करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही राज्यांनी निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारही असा विचार करत आहे. राज्यातील निर्बंध कसे कमी करायचे, यावर चर्चा सुरू आहे. राज्यातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील तिसऱ्या लाटेचा धोका यांचा विचार करुन निर्णयय घ्यावा लागणार आहे.

Advertisement

दरम्यान, दुसऱ्या लाटेतील निर्बंधांच्या काळात राज्यातील आणि देशातील व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने केलेल्या अभ्यानुसार देशांतर्गत व्यापाराचे तब्बल १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान आहे. करोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रास बसला आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानीचा आकडा मोठा आहे. निर्बंधांच्या काळात राज्यातील व्यापाराच्या नुकसानीचा आकडा सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त आहे. नुकसान वाढतच चालले आहे.

Advertisement

राज्यात या मुद्द्यावर चर्चा होत आहेत. मात्र लॉकडाउनबाबत अंतिम निर्णयय झालेला नाही. त्यासाठीच आज बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील करोना परिस्थिती तसेच निर्बंधांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. राज्य सरकारमधील मंत्र्यांत मात्र गोंधळाचे वातावरण आहे. लॉकडाउन लगेचच हटवणे योग्य ठरणार नाही असे काहींचे म्हणणे आहे. तर, टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी करावेत, असे काहींना वाटत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply