Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. काळजी घ्या रे.. ‘युनिसेफ’चा अहवाल आलाय; पहा मुलांच्या मानसिकतेवर काय झालाय करोनाचा परिणाम

पुणे : करोना संकटाने आपणास खूप काही शिकवले आहे, तर या संकटात आपण खूप काही गमावले आहे. देशांच्या अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्या. गरीबी आणि बेरोजगारी वाढली. लाखो लोकांचे प्राण गेले. मानसिक ताण तणावात वाढ झाली, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले, उद्योग-व्यवसायांचे तर कंबरडेच मोडले, करोनाने हजारो मुलांना अनाथ केले.. असे हृदयद्रावक प्रसंग या संकटात पाहण्यास मिळाले. इतके नुकसान केल्यानंतरही हा आजार वाढतच चालला आहे. या संकटाचा लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे.

Advertisement

जगाला करोनाने वेढले आहेच. मात्र, दक्षिण आशियातील देशांत या विषाणूचे अगदीच घातक रुप घेतले आहे. अन्य देशांच्या तुलनेत या देशांत संक्रमण जास्त आहे, आणि याचा परिणाम येथील लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे, असे युनिसेफने म्हटले आहे. करोनाचे संक्रमण जास्त असल्याने येथे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. या देशांना वेळेत मदत केली नाही तर येथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल, अशी भिती संघटनेने व्यक्त केली आहे. करोनाने अनेक मुलांचे आई-वडीलांना त्यांच्यापासून हिरावून नेले आहे. अगदीच लहान वयात ही मुले पोरकी झाली आहेत. याबाबत रोज येणाऱ्या बातम्या विचलित करणाऱ्या आहेत. या सर्वांचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. विशेष म्हणजे, येथे असे प्रथमच घडत आहे. करोना संकटात या भागात जवळपास दोन लाख मुलांना त्रास सहन करावा लागला आहे. यावर युनिसेफने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement

युनिसेफचे दक्षिण आशियाई क्षेत्र निदेशक जॉर्ज लारेया अडजेई यांनी सांगितले, की या भागातील देशांत सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या तुलनेत कितीतरी पटीने करोनाचे रुग्ण सापडत आहेत. श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. अशीच स्थिती पाकिस्तान, बांग्लादेश, भुटान, अफगाणिस्तान या देशांतही निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. भारतातही करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या संकटात हजारो मुले अनाथ झाली आहे. देशात अजूनही करोनाचा धोका कायम आहे. तरी देखील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने थोडा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply