Take a fresh look at your lifestyle.

..तरीही मुकेश अंबानींचा खिसा खाली..? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : मुकेश अंबानी.. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा. जगातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या, तर भारतात नंबर वन धनाढ्य व्यक्ती. अंबानीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, ही काही सांगण्यासारखी गोष्ट राहिलेली नाही. मात्र, अंबानी यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप रंजक आहेत. चला तर मग मुकेश अंबानी यांच्याबद्दलच्या व्हायरल गोष्टी जाणून घेऊ या..

Advertisement

प्रत्येकाला वाटते, की मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा खिसा नेहमीच पैशाने खुळखुळत असेल, तर तसे नाही. मुकेश अंबानी यांची पर्स नेहमीच रिकामी असते, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. ते कधीही रोख रक्कम वा एटीएम कार्ड बाळगत नाहीत. पैशाशिवाय त्यांची भ्रमंती सुरु असते. अंबानी यांनी स्वत: एका मीडिया मुलाखतीत हा खुलासा केला होता.

Advertisement

ते म्हणाले, की “पैसे जवळ असल्याने त्यांना काही फरक पडत नाही. वास्तविक, खिशात पैसे असल्यास ‘फ्लेक्सबिलीटी’ संपते. लहानपणापासूनच आपण कधीही खिशात पैसे ठेवले नाहीत.” त्यामुळे अंबानी यांच्या पर्समध्ये कधीही रोकड किंवा एटीएम कार्ड सापडणार नाही. सोबत असणारे लोकच मी काही खरेदी केल्यास त्यांचे पैसे देतात. त्यामुळे कधीही जवळ पैसे बाळगण्याची आवश्यकता वाटली नाही, असे त्यांनी सांगितले होते.

Advertisement

आजकाल प्रत्येक जण क्रेडिट कार्डवर अवलंबून असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, मुकेश अंबानी यांनी आजपर्यंत कधीही क्रेडिट कार्ड वापरलेले नाही. त्यांच्या सर्व खर्चाचा तपशील जवळची माणसेच ठेवतात. कुठे रोख रक्कम लागली, तर त्यांना मदत करतात, असे ते म्हणाले होते.

Advertisement

हातगाडीवरचे खाणे आवडते
अंबानी यांनी असाही खुलासा केला होता, की त्यांना रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या हातगाडीवरचे खाणे आवडते. विशेषतः रस्त्यावर उभे राहून खाण्यात आपल्याला कोणतीही लाज वाटत नाही. ठिकाण कोणतेही असू द्या, खाणे चांगले असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply