Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ‘तिथे’ झालेय उंदराचेच साम्राज्य; पहा कसा फटका बसलाय अवघ्या राज्याला..!

दिल्ली : जगात कधी कोणते संकट येईल याचा काही नेम नाही. आता हेच पहा ना.. अवघे जग करोना महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया या देशात काहीतरी आश्चर्यकारक घडत आहे. देशात करोना आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असतानाच न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलैंड शहरात उंदरांनी अगदीच उच्छाद मांडला आहे. विश्वास बसत नाही ना.. मात्र, हे खरे आहे.

Advertisement

या शहरांत जिकडे पहावे तिकडे उंदीरच उंदीर दिसत आहेत. लोकांच्या घरात उंदीर.. शेतात उंदीर.. दवाखन्यात उंदीर.. एवढेच काय तर शाळेत सुद्धा उंदीरच.. असे सर्वत्र उंदराचेच साम्राज्य निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे या उंदरांनी शेतातील कोट्यावधी रुपयांच्या पिकांची पूर्ण नासधूस केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नंतर आता हे उंदीर सिडनी शहरातही पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की असं एकाएकी काय घडलं की इतके उंदीर शहरात घुसले ? याचे उत्तरही मिळाले आहे.

Advertisement

असे सांगितले जात आहे, की या परिसरात बराच काळ दुष्काळ पडला होता. त्यानंतर मागील वर्षात मात्र येथे चांगला पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन झाले. त्यानंतर मात्र कोणालाही अपेक्षित नव्हते, असे उंदरांचे संकट आले. पावसामुळे येथे मोठ्या संख्येत उंदीर आले आहेत. या उंदरांनी येथे पुरता उच्छाद मांडला आहे. उंदरांनी पिकांचे पूर्ण नुकसान केले आहे. सध्या या दोन शहरात उंदीर दिसत आहे. त्यानंतर सिडनी शहरातही हा त्रास  उद्भवण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या समस्येवर काय तोडगा काढावा, असा प्रश्न आता येथे निर्माण झाला आहे.

Advertisement

दरम्यान, करोना संकटानंतर जगात अनेक नैसर्गिक संकटे येतच आहेत. नवीन वर्षही जगासाठी संकटेच घेऊन आले आहे. संकटे कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहेत. भारतात चक्रीवादळे, अवकाळी पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर यास वादळ दाखल झाले आहे. या वादळाने आपले रौद्र रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. तर आफ्रिकेतील मादागास्कर देशात भीषण दुष्काळ पडला आहे. आफ्रिकेतीलच कांगो देशात ज्वालामुखीच्या उद्रेकात अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात उंदरांनी उच्छाद मांडला आहे. जगात नैसर्गिक संकटांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे नागरिक सुद्धा पुरते हैराण झाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply