Take a fresh look at your lifestyle.

घरातील दागिने विकणेही होणार मुश्किल, सरकारचा हा नवा नियम पाहिला का..?

नवी दिल्ली : सोन्याच्या व्यवहारात अनेकदा फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशी फसवणूक होऊ नये, नागरिकांना शुद्ध सोने मिळावे, यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून नवा नियम लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे केंद्र सरकारने त्यात आणखी 15 दिवसांची वाढ केली आहे. हा नवा नियम लागू झाल्यावर घरातील दागिने विकतानाही अडचण येण्याची शक्यता आहे. काय आहे हा नवा नियम, चला तर मग जाणून घेऊ या..

Advertisement

सोन्याच्या शुद्धतेबाबत फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून देशात केवळ ‘बीआयएस हॉलमार्किंग’ (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होईल, असा नियम केला होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे (Coronavirus in India) 15 दिवसांनी मुदत वाढवली. त्यामुळे आता 15 जूनपासून ही प्रक्रिया अनिवार्य असेल. त्यानंतर देशात केवळ हॉलमार्किंग असणारेच दागिनेच विकले जाणार आहेत.

Advertisement

दागिन्यांना हॉलमार्किंग लागू होण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि ज्वेलरी इंडस्ट्रीतील (Jewelery Industry) काही लोकांनी सरकारकडे केली होती. त्यानुसार सरकारने ही मागणी मान्य केली. त्यामुळे पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्यांना वेळ मिळाला आहे.

Advertisement

सरकारने ही नवीन प्रणाली लागू करण्यासाठी एक समिती बनवली आहे. ही समिती ‘हॉलमार्किंग’शी संबंधित सर्व मुद्द्यांचे निरसन करील. हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य झाल्याने 15 जूननंतर केवळ हॉलमार्क असणारेच 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. हॉलमार्किंगमध्ये BIS चं चिन्हं, कॅरेटबाबत माहिती, दागिना बनला त्याचं वर्ष, सराफाचं नाव असेल.

Advertisement

BIS हॉलमार्किंग आंतरराष्ट्रीय मापकांशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे सोने व्यापारात पारदर्शकता वाढेल. घरातील जुने दागिन्यांचेही हॉलमार्किंग करणे आवश्यक आहे, अन्यथा हॉलमार्किंग नसणारे दागिने विकताना अडचण येऊ शकते. कदाचित तुलनेने सोन्याचे पैसे काहीसे कमी मिळतील. त्यामुळे तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर जाऊन घरातील दागिन्यांचे हाॅलमार्किंगचे काम पूर्ण करू शकता. मात्र, जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी तुम्हाला थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील.

Advertisement

दरम्यान, सोन्याच्या शुद्धतेची तपासणीसाठी सरकारने ‘BIS-Care’ नावाचे अँप लाँच केले आहे. त्यावर सोन्याची शुद्धता तपासण्यासह तुम्ही तक्रारही करू शकता. येथे तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील. सोने खरेदी-विक्री करताना कोणी फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय 1 वर्षाचा तुरुंगवासही होऊ शकतो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply