Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढत आहेत सोन्या-चांदीचे भाव; पहा आजची मार्केट पोजिशन काय ती..

मुंबई : भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून देशात सोन्यास कायमच मागणी असते. आता तर करोनाच्या संकटात आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढत आहेत. त्याचा परिणाम देशातील मार्केटवरही पडला आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढतच आहेत. काल मात्र या दरवाढीस ब्रेक लागला होता. त्यानंतर आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले आहेत. आज दिवसभरात सोन्याच्या दरात १८० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सोने आता ४९ हजारांच्याही पुढे गेले आहे. चांदीच्या दरात सुद्धा ३९० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे भाव ७२ हजार ५३० रुपये असा आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर ४० हजार ५४ रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. गुडरिटर्नस वेबसाइटनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर ४६ हजार ८०० तर २४ कॅरेटचे दर ४७ हजार ८०० रुपये असे आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७ हजार १०० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ५१ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे.

Advertisement

कोलकाता शहरात २२ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ८८० रुपये तर २४ कॅरेटचे दर ५० हजार ६५० रुपये आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेटचा सोन्याचा भाव ४६ हजार ५०० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ५० हजार ७०० रुपये असा आहे. देशात काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत सोन्याचे भाव ५६ हजारांच्याही पुढे गेले होते. दुसऱ्या लाटेतही भाव वाढत आहेत. आता तर सोने ५० हजारांचा टप्पा पार करण्याच्या अगदीच जवळ आहे. दरवाढ अशीच सुरू राहिली तर थोड्याच दिवसात सोने ५० हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

जगात अनेक देशात करोना विषाणू आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे निर्बंधात कमी केले जात आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगात वेगाने लसीकरण होत आहे. याचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply