Take a fresh look at your lifestyle.

‘सहामाही’निमित्त शेतकरी आंदोलकांनी जाळला मोदींचा पुतळा; पहा देशभरात शेतकरी आक्रमक का झालेत ते..

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या ‘क्रांतिकारी’ कृषी सुधारणा मान्य नसलेल्या शेतकऱ्यांनी देशभरात जोरदार आंदोलन करून जगाचे लक्ष वेधले आहे. तरीही न बदलेल्या मोदी सरकारच्या विरोधातील या आंदोलनास आता सहा महिने पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्ताने आंदोलकांनी आज दिवसभर काळा दिवस पाळला आहे. तसेच सकाळीच मोदींचा पुतळा जाळण्यात आलेला आहे.

Advertisement

घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून दिल्लीच्या बाहेर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन किसान आंदोलकांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनास देशभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठींबा दर्शवला आहे. मात्र, करोना कालावधी असल्याने सगळीकडे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येत आहे.

Advertisement

Kisan Ekta Morcha on Twitter: “सुबह से ही देश के अनेक हिस्सो मे लोगों ने अपने घरों पर काले झंडे लगाना और मोदी सरकार के पुतले जलाना शुरू कर दिया है। #6MonthsofFarmersProtest #KisanMajdoorEktaZindabaad @PMOIndia @AgriGoI @narendramodi @AHindinews https://t.co/o4JkXgRVSA” / Twitter

Advertisement

सोनिया गांधी (काँग्रेस), एचडी. देवेगौडा (जेडीएस), शरद पवार (राष्ट्रवादी), ममता बॅनर्जी (तृणमूल), उद्धव ठाकरे (शिवसेना), एमके स्टालिन (डीएमके), हेमंत सोरेन (जेएमएम), फारुक अब्दुल्ला (जेकेपीए), अखिलेश यादव (आरजेडी), डी. राजा (सीपीआय), सिताराम येचुरी (सीपीआय- एम) यांनीही या आंदोलनास पाठींबा दिलेला आहे. कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र आणि शेतकरी संघटनांमध्ये 11 बैठका होऊनही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. नोव्हेंबर 2020 पासून मोठ्या संख्येनं पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिल्लीतील बाह्य सीमा भागात धरणे देऊन बसलेले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply