Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बंगाल व ओडीसाला दिलाय सतर्कतेचा इशारा; पहा नेमकी काय सुरू आहे तयारी

दिल्ली : करोना विषाणूच्या संकटा पाठोपाठ देशात नैसर्गिक संकटे सुरू झाली आहेत. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर आता ‘यास’ चक्रीवादळाचे संकट घोंगावू लागले आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या या वादळाने रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे, की पुढील २४ तासात या वादळाचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. तसेच २६ मे पर्यंत यास बंगाल आणि ओडिशा राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या वादळाचा धोका ओळखून केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. एनडीआरएफ, नौसेना, वायूसेना तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्य सरकारांनी तयारीस सुरुवात केली आहे. आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. कोलकाता येथील हवामान विभागाचे उपनिदेशक संजीव बंदोपाध्याय यांनी सांगितले, की बुधवारी सकाळी ज्यावेळी यास ओडिशा राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचेल, त्यावेळी या वादळाची गती १५५ ते १६५ किलोमीटर प्रति तास अशी असेल. यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. तसेच बंगाल राज्यातील उत्तर आणि २४ परगना जिल्ह्यांत ९० ते १०० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहू शकतात. कोलकाता, मिदनापूर, हावडा या जिल्ह्यातही वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाचा धोका पाहता ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी आवश्यक पूर्वतयारी सुरू केली आहे.

Advertisement

या चक्रीवादळाचा अन्य काही राज्यांनाही फटका बसण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड या राज्यांसह अंदमान निकोबार बेटांनाही या वादळाचा फटका बसू शकतो. आसाम आणि मेघालय राज्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २६ आणि २७ मे दरम्यान या दोन्ही राज्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी आलेल्या तौक्ते या चक्रीवादळाने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, गुजरात राज्यात मोठे नुकसान केले. त्यानंतर आता यास चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. हे वादळाने सुद्धा मोठे नुकसान होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आतापासूनच नियोजन करत आहेत. त्यामुळे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न आहे. करोनाच्या संकटात आता या नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. केंद्र सरकार यासाठी राज्यांची मदत करत आहे. केंद्र सरकारकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply