Take a fresh look at your lifestyle.

वाचा महत्वाची बातमी : खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी सुरू आहेत ‘या’ कार्यवाही

दिल्ली : देशातील जनता महागाईच्या संकटाने बेजार झाली आहे. करोनामुळे पैशांची चणचण जाणवत आहे. दुसरीकडे मात्र महागाई रोज नवनवे रेकॉर्ड करत आहे. पेट्रेल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. डाळीही आवाक्याबाहेर जात आहेत. खाद्य तेलांच्या दराने तर बजेट पुरते कोलमडले आहे. खाद्यतेलांच्या किमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी आता कवायत सुरू झाली आहे. बैठकांचा धडाका सुरू आहे.

Advertisement

या बैठकीत तेलांच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी प्लान तयार केले जात आहेत. सोमवारीही बैठक घेण्यात आली. या बैठकीत खाद्यतेलांच्या किमती कशा कमी करता येतील, यावर चर्चा करण्यात आली. राज्यांनीच काहीतरी करावे, असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानुसार खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्ये आणि उद्योग जगताने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.

Advertisement

तेल उद्योग व व्यापार संघटनेचे चेअरमन सुरेश नागपाल यांनी सांगितले, की खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी करण्याची गरज नाही. यावरील कृषी उपकर सुद्धा हटवण्यात येऊ नये, असे निर्णय घेतले तरी शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आगामी खरीप हंगामावरही होऊ शकतो. मोहरीचे बी आणि तेलावर पाच टक्के जीएसटी हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात खाद्यतेलांचे दर ६२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारही या मुद्द्यावर गंभीर असल्याचे केंद्रीय खाद्य सचिवांनी सांगितले. देशात तेलाचे उत्पादन कमी होत असल्याने बाहेरील देशांतून मोठ्या प्रमाणात तेल आयात करावे लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत खाद्य तेलांच्या किमतीवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

खाद्य तेलांच्या किमती कमी करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले. यामध्ये सरकारने खाद्यतेलांचा बफर स्टॉक करावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा स्टॉक तयार करण्यासाठी स्थानिक तेल उत्पादकांकडून खाद्यतेल खरेदी करण्यात यावे, असे सुचवण्यात आले. खाद्यतेल वितरणाबाबतही काही सूचना देण्यात आल्या. दरम्यान, देशात काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावेळी तेलाचे भाव इतके वाढले  आहेत की कधीही दरवाढीचा विचार न करणारे नागरिक सुद्धा याचा विचार करू लागले आहेत. केंद्र सरकारला सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply