Take a fresh look at your lifestyle.

हे बेस्टच की.. आता दुबईतही सुरू करू शकता स्वतःची कंपनी; पहा कायद्यात काय बदल होत आहेत ते

मुंबई : दुबई म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्वाचे केंद्र. या ठिकाणी जाऊन आपल्या कंपनीच्या वतीने बिजनेस करण्याचे किंवा तिथेच वाळवंटातील नंदनवनात आपली कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न अनेकांनी रंगवले असेल. मात्र, तेथील जाचक नियम आणि अटी यातील खरा अडसर आहेत. आता तोच अडसर दूर होत आहे. त्यासाठी स्थानिक सरकारने ग्लोबल धोरण ठेवले आहे.

Advertisement

विदेशी शेअरधारक यूएईत व्यवसायासाठी लिमिटेड लायबिलिटी कंपनीत जास्तीत जास्त ४९% हिस्सेदारी खरेदी करण्याचा जाचक नियम होता. उरलेले इतर  ५१% हिस्सेदारीसाठी स्थानिक स्पॉन्सर शोधणे आणि त्याच्या नाकदुऱ्या ओढणे हा मोठा जिकिरीचा आणि डोकेदुखीचा मुद्दा होता. आता तोच दूर होणार आहे. दि. १ जूनपासून कमर्शियल कंपनी कायद्याच्या नव्या तरतुदीनुसार दुबईत विदेशी नागरिक १००% मालकी हक्काची कंपनी उघडू शकतील. यामुळे अनेकांच्या स्वपांना नवे धुमारे फुटणार आहेत.

Advertisement

आता नव्या नियमानुसार विदेशी बिझनेसच्या काही श्रेणींसाठी एक लोकल सर्व्हिस एजंट(अमिराती नागरिक) असणे आवश्यक असून त्याला शेअर नाही तर, बिझनेस सेटअप अॅग्रीमेंटअंतर्गत त्यास काही रक्कम मोबदल्याच्या रूपात द्यावी लागणार आहे. तसेच आता या नव्या नियमामुळे गुंतागुंतीच्या रचनेमुळे भारतात व्यवसाय न करू इच्छिणारे नागरिक आणि कंपन्या दुबईत कंपनी उघडून यूएईमध्ये मिळणाऱ्या कर सवलतीचा लाभ उचलू शकतील. त्यामुळे अनेकांनी त्यासाठी आताच तयारी सुरू केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply